Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीNashik News : मध्यरात्री नाशिक शहरात अग्नी तांडव

Nashik News : मध्यरात्री नाशिक शहरात अग्नी तांडव

प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग

नाशिक : गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहरामध्ये आगीचा तांडव झाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे तपोवन वगळता इतर ठिकाणी लागलेल्या आगी या तातडीने नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. त्यामुळे शहरातील या अग्निशामन केंद्राच्या जवानांचे कौतुक केले जात आहे. शेवटीतील तपोवनमध्ये लोकेश ल्युमीनेटेस्ट या प्लायवूड दुकानाला लागलेली आग ही तब्बल ९ तासापेक्षा ही अधिक काळ सुरूच होती आणि या ठिकाणी महानगरपालिकेसह इतर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी शेकडो फेरी पूर्ण केल्या.

गुरुवारचा दिवस हा अतिशय शांततेत गेला. मात्र, गुरुवारची रात्रही नाशिकमध्ये अग्नी तांडवाने धुमाकूळ घातल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. सर्वप्रथम मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक शहरातील तपोवन परिसरामध्ये असलेल्या मारुती वेफर्स शेजारी असलेल्या प्लायवूडच्या दुकानाला अचानक आग लागली. सर्वसाधारण पावणे बारा वाजेच्या सुमारास ही आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती मिळाली आणि शहरातील मुख्यालयासह पंचवटी सिडको सातपूर नाशिक रोड या विभागीय कार्यालयातील अग्निशमन केंद्राच्या बंबासह अन्य छोट्या मोठ्या गाड्या या ठिकाणी पाठविण्यात आल्या. नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या रुद्ररूप धारण केलेल्या आगीवर वरती तातडीने नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु, या प्रयत्नांना काही यश मिळाले नाही. तातडीने या ठिकाणी असलेला साठा हलविण्यासाठी म्हणून मध्यरात्री जेसीबीचा वापर करण्यात आला. या ठिकाणी जेसीपी बोलविण्यात आला आणि जेसीपीच्या माध्यमातून या ठिकाणी असलेला साठा हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आग एवढी रुद्र रूप धारण करून बसली होती की त्यामध्ये देखील अग्निशमन दलाला यश आले नाही.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर १७ प्रकारचे वाहतूक उल्लंघन शोधण्यासाठी एआय वाहतूक प्रणाली बसवणार

नंतर नाशिक महानगरपालिकेच्या सर्व अग्निशमन केंद्रावरील गाड्यांसह पिंपळगाव बसवंत सिन्नर एमआयडीसी, जीआयएसएफ, आय एस पी, या परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या देखील मदतीसाठी बोलविण्यात आल्या. परंतु, आग काही शांत होण्याचे नाव घेत नव्हती त्यामुळे सातत्याने अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ चालू होती. या जवानांनी पण आपली जिद्द सोडली नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये या आगीवरती काबू मिळवायचाच यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. मध्यरात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास लागलेली आग काही केल्या शांत होत नव्हती आणि अग्निशमन दलाच्या गाड्या या सातत्याने फिर्या मारत होत्या. सकाळी पावणे नऊ वाजेपर्यंत देखील ही आग सुरूच होती. सातत्याने या ठिकाणी आग विजवण्याचे काम हे अग्निशमन दलाचे जवान करत होते. मात्र, या काळामध्ये काही प्रमाणामध्ये आग ही शांत झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सातत्याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले.

दरम्यान, हे सर्व मध्यरात्री घडत असताना दुसरीकडे मात्र शहरातील काही भागांमध्ये देखील आग लागल्याच्या घटना या घडत होत्या. इंदिरानगर परिसरामध्ये असलेल्या ओम सुपर मार्केट या परिसरात वाईन शॉप आहे. या वाईन शॉपच्या बेसमेंट मध्ये दूर निघत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर याही धावपळीमध्ये तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी इंदिरानगर मध्ये कूच केली आणि या ठिकाणी जाऊन ही आग आटोक्यात आणली.

तिसरी घटना नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावर ती घडली. या ठिकाणी फाळके स्मारकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या एका चालत्या गाडीला आग लागल्याची माहिती शहर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आल्यानंतर तातडीने या ठिकाणी आगीचा बंब रवाना करण्यात आला आणि गाडीला लागलेली आग ही विजविण्यात नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन जवानांना यश मिळाले या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

चौथी घटना शहरातील गंजमाळ परिसरामध्ये असलेल्या कोमल कुशन या परिसरामध्ये घडली. या कोमल कुशनच्या बाजूला रात्रीच्या वेळी या परिसरात असलेले दुकानदार हे आपला कचरा हा टाकत असतात. या कचऱ्याला अज्ञात कारणामुळे आग लागली आणि या आगीने रुद्ररूप धारण केले. आजूबाजूला दुकान होती आणि याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने याही धावपळीमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी जाऊन ही आग नियंत्रणात आणली.

यानंतरची पाचवी घटना ही सातपूर येथील स्वरबाबा नगर या परिसरामध्ये घडली. या ठिकाणी असलेल्या एका घराला आग लागली. तातडीने अग्निशामक दलाच्या जवानांनी जाऊन ही आग आटोक्यात आणली सुदैवाने याही ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्यामध्ये अग्नीचा तांडव हा गुरुवारी मध्यरात्रीनंतर सुरू झाल्यावरती सर्व घटनांचे गांभीर्य ओळखून नाशिक महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांच्यासह सहाय्यक अग्निशमन अधिकारी प्रदीप बोरसे राजेंद्र नाकील, पी व्ही एल यलमामे, आर.डी. कदम यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी हे सर्व परिस्थितीवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करीत होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.

शहरामध्ये मध्यरात्री समस्त नाशिककर हे झोपलेले होते आणि त्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या बाजूला नाशिककरांची सुरक्षितता कायम राहावी यासाठी म्हणून नाशिक शहरातील महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी हे सातत्याने प्रयत्न करत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -