
दिल्लीतल्या गाजलेल्या खटल्यावर आधारित नवीन वेब सिरीज
नवी दिल्ली : अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी 'पाताल लोक'चे दिग्दर्शक प्रोसित रॉय यांच्या आगामी वेब सिरीजच्या चित्रीकरणाला दिल्लीमध्ये सुरुवात केली आहे. ही सिरीज १९७८ मधील दिल्लीतील गाजलेल्या रंगा-बिल्ला खटल्यावर आधारित असून, त्या काळातील समाजमनावर झालेल्या परिणामांचे चित्रण यात केले जाणार आहे .

४०व्या वर्षीसुद्धा दिसू शकता सुंदर! भाजलेले हरभरे खाल्ल्याने तुमच्या शरीराला शक्ती मिळते. सर्वांच्या घरी हा पदार्थ असतोच. मधुमेह रुग्णांनी भाजलेले ...
सिरीजचे नाव अद्याप जाहीर झाले नसले तरी, ती एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणावर आधारित आहे. चित्रपटसृष्टीतील या नव्या प्रकल्पात अली फजल आणि सोनाली बेंद्रे मुख्य भूमिका साकारत आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या सिरीजमध्ये १९७८ मधील दिल्लीतील गाजलेल्या रंगा-बिल्ला खटल्याचे चित्रण करण्यात येणार आहे. या प्रकरणात दोन किशोरवयीन भावंडांचे अपहरण आणि हत्या झाली होती, ज्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. सिरीजचे चित्रीकरण सध्या दिल्लीतील विविध भागांमध्ये सुरू आहे.