Sunday, October 19, 2025
Happy Diwali

Todays Gold Rate : सोन्याचे दर गाठणार १ लाखांचा टप्पा ?

Todays Gold Rate : सोन्याचे दर गाठणार १ लाखांचा टप्पा ?

मुंबई : मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत अनेक शुभ मुहूर्त असल्यामुळे सण समारंभ मोठ्या प्रमाणावर होतात. या समारंभात प्रत्येक जण उठून दिसण्यासाठी सोन्याचे दागिने परिधान करतात. तर काहीजण हौस म्हणून घालतात. मात्र आता सोन्याच्या दरात झालेली वाढ पाहता सणसमारंभात लोकांच्या आनंदावर विरझन पडणार आहे. आज सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार युद्धाच्या, तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ होत आहे. सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात गुंतवणुकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानली जात आहे. अशात सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काल (दि १६ ) सोन्याच्या दराची नोंदणी ९७ हजार इतकी झाली. तर आज (दि १७) सोन्याच्या दराची नोंदणी ९८ हजार पर्यंत गेली आहे. हा दर काही दिवसांनी १ लाखांचा टप्पा पार करणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सणासुदीच्या काळात वाढलेल्या सोन्याच्या या दरामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >