कोल्हापूर : कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान फुटबॉलप्रेमींनी धक्कादायक कृत्य केलं. फुटबॉल सामन्यादरम्यान टीमला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस म्हणून प्रेक्षकांनी चक्क जिवंत मेंढी आणली. या घटनेने स्टेडियममध्ये गोंधळ उडाला.
कोल्हापूर आणि फुटबॉल यांचं वेगळंच नातं आहे. कोल्हापूर आपल्या ९० वर्षांपेक्षा जास्त जुन्या आणि गौरवशाली फुटबॉल परंपरेसाठी ओळखलं जातं. याचं कोल्हापुरात धक्कादायक प्रकार घडला. काल (दि १६) कोल्हापुरात फुटबॉलचा अंतिम सामना रंगात आला होता. खंडोबा तालीम मंडळ आणि संयुक्त बुधवार पेठ यांच्यात जोरदार लढत सुरू होती.
Actor Sagar Karande : अभिनेता सागर कारंडेला लुटणाऱ्या चोराचा पर्दाफाश!
प्रेक्षकांनी गॅलरी खचाखच भरली होती. बुधवार पेठच्या समर्थकांनी आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी एक वेगळीच युक्ती केली. त्यांनी बक्षीस म्हणून चक्क एक जिवंत मेंढी गॅलरीत आणली अन् एकच गोंधळ उडाला. अचानक गॅलरीत मेंढी दिसल्याने एकच गोंधळ उडाला. मैदानावरील खेळाडू आणि पंचही काही क्षण थबकले.