
कर्जत : बदलापूरमध्ये झालेल्या दोन चिमुकल्यांवरच्या अत्याचाराची पुनरावृत्ती रायगडमध्ये घडली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाणे हद्दीत एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या दोन निरागस मुलींवर स्कूलबस मधील क्लीनरने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण रायगड हादरले आहे.

मुंबई : अनेक विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांना हसवणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' या शो मधील सागर कारंडे नेहमीच त्याच्या विविध भूमिकेसाठी चर्चेत असतो. काही ...
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जतमधील वदप येथील शाळेतील स्कूलबसमध्ये क्लीनरने पाच वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केले. करण दीपक पाटील असे या नराधमाचे नाव आहे .स्कूल बस मध्येच मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे मुलींच्या मेडिकल तपासात उघडकीस आले असून याप्रकरणी बस क्लीनरला कर्जत पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे .याप्रकरणी आरोपीवर कर्जत पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे .ही घटना बदलापूर घटनेची पुनरावृत्ती असून आपल्या मुलींना शाळेत पाठवायचे की नाही? असा सवाल पालकांकडून केला जात आहे .