Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीशिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख कूचकामी; ठाकरे शिवसैनिकांचा आरोप

शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख कूचकामी; ठाकरे शिवसैनिकांचा आरोप

उबाठा शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख बदलण्याची कार्यकर्त्यांची मागणी

माणगांव : आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता प्रत्येक राजकिय पक्षाने मोर्चेबांधणी केली आहे. अनेक राजकीय स्थित्यंतरे घडत आहेत. दक्षिण रायगड शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख पद बदलुन सुमारे ३ महिने झाले आहेत. परंतु, जिल्हा नेतृत्वाला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व ग्रामीण भागातील शिवसैनिक ओळखत देखिल नसल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला अधोगती लागल्याचे चित्र दक्षिण रायगड मध्ये दिसत आहे.

जिल्हा नेतृत्व शिवसैनिकांना मान्य नसल्याने मोठ्या प्रमाणावर पक्षात अस्वस्थता निर्माण झाली असून उबाठा गटातील अनेक नेते पक्षांतर करत असल्याचे प्रामुख्याने दिसत आहे. आणि याचा फायदा सत्तेत असलेल्या शिवसेना (शिंदे गट), भाजपा, राष्ट्रवादी (अप) यांना मिळत आहे.

Breaking News : धक्कादायक! पाच वर्षाच्या चिमुकलींवर स्कुल बसमध्ये लैंगिक अत्याचार

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत, ग्रामपंचायती निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर या पक्षांतराने फरक पडणार, असा रायगड जिल्ह्यातील राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे.

लोकसभा निवडणुक व विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जाऊन सुद्धा ठाकरे शिवसैनिक पक्षात ठाम होता. परंतु, जिल्हा नेतृत्वात बदल करण्यात आल्यावर मोठ्या प्रमाणावर पक्षाला हानी होत असल्याने दिसून येत आहे, असे मत रायगड जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत

जिल्हाप्रमुख हे कणखर व कुशल व संघटना बांधणी करण्यात असमर्थ ठरत असल्याचे दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. प्रचंड नाराजी या निवडीवर शिवसैनिकांची व पदाधिकाऱ्यांची असल्याने पक्षात समन्वयक दिसून येत नाही.

जाणकारांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा नेतृत्व बदलण्याची गरज आज ठाकरे शिवसेनेला गरज भासत आहे. जिल्हा नेतृत्व असेच राहिले तर ठाकरेंची शिवसेना जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ४ क्रमांकावरच नव्हे तळा-गाळात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे देखील बोलण्यात येत आहे.

जिल्ह्यातील पक्षांतर जिल्हा नेतृत्व थांबवू शकत नाही व त्यांना कोणीही जुमानत नाही हे यावरून दिसत असल्याने दक्षिण रायगड मधील ठाकरेंची शिवसेना व पदाधिकारी पर्याय शोधत आहेत हे वास्तवशाली सत्य आहे, असे मत रायगड जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -