Saturday, October 25, 2025
Happy Diwali

ससूनच्या अहवालात दीनानाथ रुग्णालय व डॉ. घैसास यांना क्लीन चिट

ससूनच्या अहवालात दीनानाथ रुग्णालय व डॉ. घैसास यांना क्लीन चिट

पुणे : ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने दिलेल्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर कोणताही ठपका ठेवलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. ६ पानांचा हा अहवाल पुणे पोलिसांना सादर करण्यात आला आहे.

अधिकच्या माहितीनुसार, या अहवालात दीनानाथ रुग्णालयातील उपचार प्रक्रियेबाबत समितीकडून स्पष्ट भूमिका घेतली गेली असून, कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय दुर्लक्ष झाले नसल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी या अहवालातील चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर ससून रुग्णालयाकडून पुन्हा अभिप्राय मागवला आहे. तत्पूर्वी, या प्रकरणात सुरुवातीपासूनच तनिषा भिसे यांचे कुटुंबीय रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत होते. विशेषतः तनिषाच्या नणंदेने प्रसारमाध्यमांसमोर उपचारप्रक्रियेतील त्रुटी व संपूर्ण घटनाक्रम मांडला होता. पोलिस प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली होती.

तर या घटनेनंतर भिसे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. भविष्यात अशी दुर्लक्षाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आमचा रोष केवळ एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण ढिसाळ व्यवस्थेवर आहे,’ असे स्पष्ट मत कुटुंबीयांनी मांडले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास व निर्णय ससून रुग्णालयाच्या अंतिम अभिप्रायानंतर घेतला जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा