मुंबई : अवघ्या जगाला वेड लावणारा अभिनेता म्हणून रितेश देशमुखची खास ओळख आहे. रितेशने आजपर्यंत मराठी हिंदी अशा दोनी माध्यमांतील सिनेसृष्टीसाठी काम केले आहे. लय भारी चित्रपटापासून ते वेड चित्रपटापर्यंत रितेशने चाहत्यांची मने जिंकली. आता रितेशचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तत्पूर्वी रितेशने त्याच्या चाहत्यांजवळ मदत मागितली आहे.
Actor Sagar Karande : अभिनेता सागर कारंडेला लुटणाऱ्या चोराचा पर्दाफाश!
रितेश देशमुख हा नेहमीच चर्चेत असतो. विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटानंतर आता रितेशचा ‘राजा शिवाजी’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट शिवाजीमहाराजांवर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी रितेशचा एक लूक व्हायरल झाला होता त्यानंतर चर्चाना उधाण आले होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये रितेशने या चित्रपटाचे पोस्टर समाज माध्यमांवर पोस्ट केले होते. त्यानंतर आज रितेशने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केली आहे. ज्या मध्ये रितेश चाहत्यांजवळ मदत मागत आहे.
We @mfc & @jiostudios are currently producing a film on the life of India’s greatest warrior Shri Chhatrapati Shivaji Maharaj, titled ‘Raja Shivaji’. We’re on the hunt for talented artists & designers to create a captivating title logo (Fonts देवनागरी & Roman English). If you’re… pic.twitter.com/1rzuQUKrJR
— Riteish Deshmukh (@Riteishd) April 17, 2025
काय म्हणाला रितेश ?
“आम्ही आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढत आहोत. त्या चित्रपटाचं नावं ‘राजा शिवाजी’ आहे. आम्ही या चित्रपटाचं टायटल लोगोच्या शोधात आहोत. आपल्यापैकी कोणी जर डिझाइनर असेल,कोणी कॅलिग्राफी आर्टिस्ट असतील तर कृपया आपण या चित्रपटावर आपले डिझाइन तयार करावेत आणि खाली दिलेल्या ईमेलच्या पत्त्यावर पाठवावे. ज्यांचं डिजाईन या चित्रपटासाठी निवडलं जाईल त्यांना आम्ही क्रेडिट देऊ. हा चित्रपट आपला स्वतःचा आहे असं समजून कृपया डिजाईन तयार करा” असं अभिनेता रितेश देशमुख म्हणाला. दरम्यान तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.