पुणे : पुणे – सातारा महामार्गावर व्होल्व्हो एसी बसला भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली. आग लागल्यामुळे बस जळून खाक झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रखरखत्या सकाळच्या उन्हात आज (दि १७) पुणे – सातारा महामार्गावर व्होल्व्हो एसी बसने अचानक पेट घेतला. या बसमधून २० -२५ प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी आपले प्राण वाचवण्यासाठी बसमधून बाहेर उड्या मारल्या. या घटनेत काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. आग लागताच मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली.
Kolhapur News : फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी आणली जिवंत मेंढी!
स्थानिक नागरिकांनी आगीच्या घटनेसंदर्भात अग्निशमन दलास माहिती दिली. मात्र, आगीचा भडका वाढल्याने अग्निशमन दलाची गाडी येण्यापूर्वीच बस जळून खाक झाली. प्राथमिक माहितीनुसार ही आग वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे वाहन तापल्यामुळे लागली आहे. दरम्यान या दुर्घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.