Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीपीओपी की शाडूच्या गणेशमूर्ती? तिढा कायम

पीओपी की शाडूच्या गणेशमूर्ती? तिढा कायम

एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातही मूर्ती कार्यशाळा बंद, मूर्तिकारांपुढे मोठा पेच

मुंबई (प्रतिनिधी) : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) की शाडूचया गणेशमूर्ती याबाबतचा तिढा कायम असल्याने मूर्तिकरांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातही मूर्ती कार्यशाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे मुंबई शहर, उपनगरांत आवश्यक गणेशमूरर्तींचा पुरवठा कसा होणार, असा प्रश्न मूर्तिकारांसमोर उभा राहिला आहे. शासनाने पीओपी गणेशमुर्तीवरील बंदी हटवावी अशी मूर्तीकारांची मागणी आहे. यावर अजुनही संभ्रम कायम असल्याने लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर गणेशमूर्तींचा तुटवडा भासणार आहे.

मुंबई शहर व उपनगरांत सरासरी १ लाख ९६ हजारांपेक्षा जास्त घरगुती गणपती आहेत, तर सार्वजनिक गणेश उत्सवाची संख्या सुमारे १५ हजार इतकी आहे. एवढी मोठी मूर्तीची मागणी पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार एप्रिलमध्ये आपल्या मूर्तीकार्यशाळा सुरू करतात. सुमारे सहा ते साडेसहा हजार कारखाने (पालिकेकडे नोंद होणाऱ्या कारखान्यांची संख्या सुमारे ४ हजारांच्या घरात आहे) मूर्तीकार मोठ्या मेहनतीने मूर्ती घडवत असतात. मात्र आता पीओपी की शाडूची गणेशमूर्ती घडवायची असा पेच निर्माण झाला आहे.

पर्यावरणाच्या अनुशंगाने पाण्याचे प्रदूषन टाळण्यासाठी पीओपीच्या मूर्तींवर शासनाने बंदी घातली आहे. त्यातच पीओपी गणेशमुर्तींच्या विसर्जनावरही शासनाने मनाई केली होती. त्यामुळे गणेशभक्त आणि पालिका प्रशासनातही यामुळे अनेकवेळा वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. मुंबई शहरात उंच गणेशमुर्त्या हे गणेशउत्सवाचे आकर्षण असते. इतक्या उंच मुर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसमधून साकारल्या जातात. मात्र शाडूतून इतक्या उंच मूर्ती साकारणे शक्य नसल्याचे मूर्तीकार म्हणतात. पीओपीच्या मूर्ती बनवायला सोप्या, वजनाने हलक्या आणि हातळण्याच्या दृष्टीने पीओपीची मूर्ती सोयीस्कर ठरते असे मुर्तीकारांचे आणि सार्वजनिक उत्सव मंडळांचे म्हणणे आहे. याउलट मातीच्या मूर्ती या वजनाने जड असतात. त्या हाताळायला नाजूक आणि बनवायलाही वेळ लागतो. त्यामुळे यावर कोणता तोडगा निघतो याकडे आता मूर्तीकार आणि सार्वजनिक उत्सव मंडळांचे लक्ष लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -