
पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात राज्यसेवेची मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनाला अखेर यश आले असून मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.
एमपीएससीने गुरुवारच्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता मुख्य परीक्षा २६, २७ आणि २८ मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी जवळपास साडे सात हजार उमेदवार बसले होते. उमेदवार गेले दोन दिवस परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. अखेर एमपीएससीने नव्या तारख्या जाहीर केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे
दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ च्या सुधारित निकालानुसार नव्याने पात्र ठरलेल्या या ३१८ उमेदवारांना राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या पूर्व तयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला नसल्यामुळे २६ ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उमेदवारांकडून आयोगास निवेदने प्राप्त झाले आहेत. उमेदवाराकडून प्राप्त निवेदन तसेच इतर बाबींचा विचार करून प्रस्तुत राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ सुधारित वेळापत्रकानुसार २७, २८, २९ मे या कालावधीत घेण्यात येईल.