मुंबई(ज्ञानेश सावंत): मागच्या सामन्यात मुंबई इंडियंन्सने दिल्ली कॅपीटल्सवर शेवटच्या षटकात ३ धावचीत करुन विजय मिळवला व सनरायजर्स हैदराबादने पंजाब किग्जवर सहज विजय मिळवला. दोन्ही संघ आता पर्यंत ६ सामने खेळलेत त्या पैकी चार सामन्यामध्ये पराजयाला सामोरे जावे लागले. दोन्ही संघ फलंदाजी व गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट आहेतच परंतु २०-२० मध्ये ज्याची फलंदाजी किंवा गोलंदाजी उत्कृष्ट झाली त्यांचा तो दिवस.
गेल्या सामन्यात सामन्यात सनरायजर्सकडून अभिषेक शर्माने ५५ चेंडूत १४१ धावांची जबरदस्त खेळी करुन विजय खेचून आणला व मुंबईच्या सामन्यात कर्ण शर्माने ३ बळी घेवून मुंबईचा पराभवाचा वनवास संपवला. आजचा सामना वानखेडे स्टेडीयम वर होत जो धावांसाठी अनुकुल आहे. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक असे बलाढ्य फलंदाज आहेत त्यांमुळे क्रिकेट रसीकांना आज एक रोमांचकारी सामना पाहवयास मिळेल. आतापर्यंत मुंबई इंडियंन्स व सनरायजर्स हैदराबाद यांच्या मध्ये २३ सामने झाले आहेत त्यापैकी मुंबईने १३ सामने जिंकले व हैदराबादने १० सामने जिंकले.
आजच्या सामन्यांत दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे, परंतु जो संघ नाणेफेक जिंकेल तोच विजयाचा दावेदार ठरेल. आजच्या सामन्यात अभिषेक विरुद्ध बुमराह हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. इशान किशन आज मुंबई विरुद्ध खेळू शकतो गेले चारही सामने तो लवकर बाद झाला आहे. मागील सामना जिंकल्यामुळे मुंबई इंडियंन्सचा आत्मविश्वास वाढला असेल. त्यांचीही फलंदाजी उत्तम आहे तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, नमन धीर, हार्दिक पांड्या असे फलंदाज आहेत.
रोहीत शर्माला अजून सूर गवसलेला नाही. आजच्या सामन्यात रोहीतला सूर गवसेल अशी वाट पाहत आहेत. तसेच मुंबई इंडियंन्सची गोलंदाजीही चांगली आहे. जसप्रित बुमराह आल्यामुळे त्यांचीही गोलंदाजीची ताकद वाढली आहे. जोडिला टेंट बोल्ट, मिचेल सँटनर, दिपक चहर, कर्ण शर्मा असे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. एकूणच एक रोमांचक मुकाबला प्रेक्षकांना पाहावयास मिळेल यात शंका नाही. शेवटी जो संघ चांगला खेळतो तोच जिंकतो.
मुंबई : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…
मुंबई : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…
रवींद्र तांबे जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.…
मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली…
मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला संबोधले जात असले तरी रेल्वेखालोखाल बेस्ट उपक्रमाच्या बसेसना जीवनवाहिनीचा मान दिला जातो.…
रियास बाबू टी नोव्हेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दीनदयाळ अंत्योदय…