मुंबई: वानखेडेच्या मैदानार इंडियन प्रीमियर लीगमधील ३३व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर जबरदस्त विजय मिळवला आहे. हैदराबादने मुंबईला विजयासाठी १६३ धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने हे आव्हान ४ विकेट राखत पूर्ण केले.
आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरूवात चांगली होती. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने मिळून ३.५ षटकांत ३२ धावा केल्या. रोहित शर्मा लयीमध्ये दिसत होता. मात्र आजही त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयश आले. रोहितने ३ षटकारांच्या मदतीने १६ बॉलमध्ये २६ धावा केल्या. रयान रिकल्टनही फॉर्ममध्ये दिसला. दरम्यान त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. रिकल्टन हर्षल पटेलने बाद केले. रिकल्टनने पाच चौकारांच्या मदतीने २३ बॉलवर ३१ धावा केल्या. यानंतर विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादवने मिळून तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने दोन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने १५ बॉलमध्ये २६ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सचा चौथा विकेट विल जॅक्सनच्या रूपात पडला. जॅक्सने ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २६ बॉलवर ३६ धावा केल्या.
सध्याच्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांची कामगिरी काही खास राहिलेली नाही. दोन्ही संघांनी आतापर्यत ६ सामने खेळलेत. यापैकी २ सामन्यांत विजय मिळालाय. तर चार सामन्यांत पराभव सहन करावा लागलाय.
मुंबईविरुद्ध फलंदाजी करताना सनरायजर्स हैदराबादला पहिल्याच बॉलवर झटका असता मात्र अभिषेक शर्माला जीवनदान मिळाले. याचा त्याने फायदा घेतला आणि काही चांगले शॉट्स खेळले. सुरुवातीलाम ६ षटकांत हैदराबादने एकही विकेट न गमावता ४६ धावा केल्या. मुंबईला पहिले यश हार्दिक पांड्याने दिले. त्याने अभिषेकला बाद केले. अभिषेकने ७ चौकारांच्या मदतीने २८ बॉलवर ४० धावा केल्या. अभिषेक आणि हेड यांच्यात पहिल्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी झाली.