Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीCash On Wheels : पंचवटी एक्सप्रेस एटीएम असलेली भारतातील पहिली ट्रेन!

Cash On Wheels : पंचवटी एक्सप्रेस एटीएम असलेली भारतातील पहिली ट्रेन!

मुंबई : ट्रेनमध्ये बसून तुम्ही एटीएममधून रोख रक्कम काढू शकता, हे ऐकून आश्चर्य वाटतंय ना? पण ही आता कल्पना नाही – हे आहे सत्य! होय, मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस भारतातील पहिली ट्रेन बनलीये जिथं बसवण्यात आलंय ‘एटीएम ऑन व्हील्स!’ नक्की काय आहे रेल्वेचा नवा उपक्रम, चला जाणून घेऊ या अधिक माहितीविषयी…

भारतीय रेल्वेच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाअंतर्गत भुसावळ रेल्वे विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने हा एटीएमचा पहिला प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला आहे. हे एटीएम ट्रेनच्या एसी कोचमध्ये बसवण्यात आलंय, पण त्याचा उपयोग संपूर्ण २२ डब्यांमधील प्रवासी करू शकतात – कारण सगळे डबे वेस्टिब्यूलने जोडलेत. हे सगळे ठिक आहे पण एटीएम ट्रेनमध्ये चालत असताना काम करतंय का? तर हो!

चाचणीदरम्यान संपूर्ण प्रवासात हे मशीन सुरळीतपणे कार्यरत होतं. फक्त इगतपुरी ते कसारा दरम्यानच्या बोगद्यांमध्ये थोड्याशा नेटवर्क अडचणी होत्या, पण त्या अपवाद ठरल्या. या एटीएमचा वापर फक्त रोख रक्कम काढण्यासाठीच नाही, तर चेकबुक ऑर्डर, अकाउंट स्टेटमेंट मिळवणं यासाठीही करता येतो. आणि विशेष म्हणजे हाच एटीएम मुंबई-हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस मध्येही प्रवाशांसाठी उपलब्ध असेल!

Pune : पुण्यात चितळेंच्या नावाने ग्राहकांची फसवणूक, पोलिसांनी केली कारवाई

सुरक्षिततेचीही पूर्ण खबरदारी घेतली असून एटीएममध्ये शटर सिस्टीम आहे आणि २४ तास CCTV कॅमेऱ्यांद्वारे देखरेख केली जाते. भविष्यात ही सुविधा प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली, तर ही योजना इतर गाड्यांमध्येही वाढवली जाणार आहे! त्यामुळे भारताच्या रेल्वेचा प्रवास आता केवळ मंजिलपर्यंत नाही, तर आधुनिकतेकडेही सुरू झालाय! कॅश ऑन व्हील्स हे फक्त नाव नाही, ही आहे भारतीय रेल्वेची एक क्रांती! आणि ही क्रांती सुरू झालेय आपल्या लाडक्या पंचवटी एक्सप्रेसपासून!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -