Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीHousing : पहिल्या तिमाहीत घरांची विक्री मंदावली

Housing : पहिल्या तिमाहीत घरांची विक्री मंदावली

मुंबई : डिजिटल रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन अँड अॅडव्हाईझरी प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर डॉटकॉमच्या ताज्या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत देशभरातील आठ प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री २०२४ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत १९ टक्क्यांनी मंदावली आहे. मालमत्तेच्या वाढत्या किंमतींमुळे घर खरेदी लांबणीवर टाकली जात आहे.

माजी आयपीएस के. अण्णामलाई मंत्री होणार ? केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ?

जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत देशभरातील आठ प्रमुख शहरांमध्ये घरांचा पुरवठा २०२४ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी झाला आहे. वाढत्या महागाईचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक अस्थिरतेचा घरांच्या पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Pune : पुण्यात चितळेंच्या नावाने ग्राहकांची फसवणूक, पोलिसांनी केली कारवाई

आयात शुल्क युद्ध आणि वाढती महागाई यामुळे घरांचा पुरवठा आणि घरांची खरेदी या दोन्हीत घट दिसून आल्याचे हाऊसिंग डॉटकॉम आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे ग्रुप चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ध्रुव अग्रवाल म्हणाले.

Dombivli News : डोंबिवलीतील खेळाडूंची शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराला गवसणी!

जानेवारी-मार्च या तिमाहीत एक लाखांपेक्षा कमी घरे विकली गेली. या विश्लेषणात समाविष्ट करण्यात आलेल्या बहुतांशी शहरांत ही संख्या घटल्याचे दिसते. बंगळूर आणि चेन्नईमध्ये हा ट्रेंड दिसला नाही, तर हैदराबाद, मुंबई आणि पुण्यात ही विक्री तीव्रतेने कमी झालेली दिसली.

Todays Gold Rate : सोन्याचे दर गाठणार १ लाखांचा टप्पा ?

बंगळुरूमध्ये २०२४ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ११,७३१ घरांच्या विक्रीसह १३%ची वाढ पहायला मिळाली. चेन्नईमध्ये ही ४,७७४ घरांच्या विक्रीसह ८%ची वाढ झाली. या तुलनेत इतर प्रमुख शहरांत घरांच्या विक्रीत घसरण झालेली पहायाला मिळाली. यात अहमदाबाद १०,७३० (-१७%), दिल्ली एनसीआर ८४७७ (-१६%), हैदराबाद १०,४६७ (-२६%), कोलकाता ३,८०३ (-१%), मुंबई ३०,७०५ (-२६%), आणि पुणे १७,२२८ (-२५) येथे घरांची विक्री मंदावलेली दिसली.

मार्केट करेक्शनचे संकेत नवीन पुरवठ्यात जी घट आली आहे त्यातून देखील दिसत होते. आठ पैकी पाच शहरांतील नव्या घरांच्या लॉन्चच्या संख्येत वार्षिक घट दिसून आली. पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादेत संख्येच्या दृष्टीने सर्वात तीव्र घसरण झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.

पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये २०२४ च्या तुलनेत नवीन लॉन्च झालेल्या घरांच्या संख्येत क्रमशः १५,५४३ (-३८%), १०,१५६ (-३३%), २,३८४ (-२३%) ची घट झाली आहे. इतर प्रमुख शहरे जसे की चेन्नई ४,०७० (-१४%), मुंबई ३१,३२२ (-१५%) येथे ही नवीन लॉन्च प्रकल्पात घट झाली असल्याचे पहायला मिळाले. याउलट बंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि कोलकाता येथे मात्र नवीन लॉन्च प्रकल्पात वाढ झाली आहे. ही वाढ क्रमशः १८,१८३ (८२%), ७,९५२ (१६%) आणि ३,५३४ (१३८%) इतकी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -