Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबई ते रायगड.. सुरू आहे सत्तेचा डावपेच!

मुंबई ते रायगड.. सुरू आहे सत्तेचा डावपेच!

मुंबई : महापालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि सगळे पक्ष आपापली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरलेत. ठाकरे गटासाठी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची आहे. कारण त्यांचा बालेकिल्ला म्हणजेच मुंबई – इथे शिंदे गट सतत गळती लावतेय. कालपरवा संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला.

यापूर्वीही अनेक माजी नगरसेवकांनी हात झटकलेत. मुंबईत शिंदे गट ताकद वाढवत असतानाच रायगडमध्ये वेगळीच रणधुमाळी सुरूय. इथे राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे आणि त्यांच्या विरोधात ठाकरे, शिंदे, भाजपचे आमदार – सगळेच थेट भिडलेत.

तटकरे कुटुंबीयांचं रायगडवर बरेच वर्ष वर्चस्व राहिलंय. पण आता खुद्द महायुतीतच त्यांच्याविरुद्ध नाराजी आहे. शिंदे गटाचे आमदार आदिती तटकरे पालकमंत्री होऊ नयेत यासाठी चक्क नाराजी व्यक्त करतायत.

यातच शेकापचा पूर्ण पत्ता गायब झालेला दिसतोय. जयंत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय पाहता, शेकापचा गड असलेला रायगड आता पूर्णपणे ढासळलाय. आणि हो या सगळ्या राजकारणात भाजप आपली सत्ता मजबूत करत चाललेय.

तर एकंदरीत मुंबई आणि रायगडमध्ये राजकारण प्रचंड तापलंय. एकीकडे ठाकरे गट गळती थांबवण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे शिंदे गट सत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे.

पण या सगळ्या धावपळीत लोकांचे प्रश्न कुठे आहेत? ते अजूनही पाण्यासाठी, रस्त्यांसाठी आणि विकासासाठी वाट बघतायत… आता बघायचं… या राजकारणात पुढचं पाऊल कोण टाकतो, आणि कुणाचा डाव उलटतो! तुम्हाला काय वाटतं, खाली कमेंट करुन नक्की सांगा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -