नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान असणारे नाशिकमधील (Nashik) त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple ) दर्शनासाठी भाविकांची नेहमीच मोठी गर्दी असते. राज्यासह परदेशातून आलेले लोक भगवान शंकराच्या दर्शनासाठी येथे येतात. मात्र मंदिरात दर्शनासाठी (Trimbakeshwar Temple Darshan) होणारी प्रचंड गर्दी टाळण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी अनेक भाविक जलद दर्शनाच्या शोधात असतात. त्यावेळी अनेकजण व्हीआयपी दर्शन (VIP Darshan) करण्याचा पर्याय निवडतात. मात्र याचाच फायदा घेऊन मंदिर परिसरात काही बोगस लोक व्हीआयपी दर्शन पासचा काळाबाजार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Cash On Wheels : पंचवटी एक्सप्रेस एटीएम असलेली भारतातील पहिली ट्रेन!
त्र्यंबकेश्वर मंदिरात काही एजंट परराज्यातून आलेल्या भाविकांना लक्ष्य करुन त्यांना बोगस व्हीआयपी दर्शन (VIP Darshan Fraud) पास उपलब्ध करुन देतात. हे पास बनावट असून एका पासकरिता २ हजार रुपये आकारले जातात. सहाशे रुपयांचे देणगी दर्शन पास तब्बल दोन हजार रुपयांना विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. सुरतचे चिराग दालिया आणि काही भाविक मार्च महिन्यात त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar Temple) आले असताना त्यांची फसवणूक झाली आहे. एका अनोळखी व्यक्तीने त्यांना दिलेल्या पासेससाठी दोन हजार रुपये घेतले मात्र ही तिकिटे मंदिरातल्या यंत्रावर स्कॅन झाली नाही त्यामुळे हा घोटाळा समोर आला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी संशयित नारायण मुर्तडक याच्या विरोधात ठकबाजीचा गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, याआधीही ‘त्वरित दर्शन घडवून देतो’ असे आमिष दाखवून हे एजंट भाविकांकडून एक हजार ते चार हजार रुपयांपर्यंतची रक्कम उकळत असल्याचे समोर आले होते. याबाबत एका वृत्तवाहिनीने मंदिरातील अशा गैरप्रकारांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र अद्यापही हा प्रकार सुरु असून देवाच्या दारी भाविकांची फसवणूक होणं ही चिंताजनक बाब आहे.