Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीपुण्यात 'खोट्या बाकरवडी'चा पर्दाफाश; चितळे बंधूंचं नाव वापरून पुण्यात गंडा!

पुण्यात ‘खोट्या बाकरवडी’चा पर्दाफाश; चितळे बंधूंचं नाव वापरून पुण्यात गंडा!

पुण्यात राहून ‘चितळे बंधू मिठाईवाले’ हे नाव ऐकलेलं नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. पण… याच नावाच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय. आणि त्यात बळी पडलेत ‘बाकरवडी’चे चाहते… ‘बाकरवडी’ची ही लोकप्रियता कुणाच्या तरी फसवणुकीचं साधन बनली.. आज आपण ऐकणार आहोत ‘खोट्या बाकरवडी’च्या फसवणुकीची खरी कहाणी!

चितळे स्वीट होम या दुकानानं लोकांची दिशाभूल करत चितळे बंधूंच्या नावाखाली आपली बाकरवडी विकली. चितळे बंधूंचे स्वीय सहायक नितीन दळवी यांनी ग्राहकांकडून ऐकले की बाकरवडीची चव बदललीय!.. ते चक्रावले… त्यांनी बाजारातून काही पाकिटं घेतली आणि पाहणी केली. आणि इथेच उलगडा झाला एका मोठ्या फसवणुकीचा!

सदाशिव पेठेतील ‘चितळे स्वीट होम’ नावाच्या दुकानाने एक नवाच ब्रँड बाजारात आणला होता… ‘पुणेरी स्पेशल बाकरवडी’… पण पॅकिंगवर मात्र वापरले गेले ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांचे अधिकृत ई-मेल, ग्राहक क्रमांक, संपर्क तपशील! हे पाहून नितीन यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

विश्रामबाग पोलिसांनी ‘चितळे स्वीट होम’चे मालक प्रमोद प्रभाकर चितळे यांच्यावर IPC कलम ३१८(२), ३५० आणि IT कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत भागीदार इंद्रनील चितळे यांनीदेखील ब्रँडचा सरळ सरळ गैरवापर केल्याबद्दल स्वतंत्र तक्रार दाखल केलीय.

प्रसिद्ध नाव, नावाजलेली चव, आणि ग्राहकांचा विश्वास… हे सगळं एका चुकीच्या वापराने उध्वस्त होऊ शकतं. ब्रँड म्हणजे केवळ नाव नाही, तो असतो गुणवत्तेवर उभा असलेला विश्वास… तोच जर खोट्या नावाने विकला गेला, तर फसवणूक ही केवळ कंपन्यांची नव्हे तर आपल्या भावनांचीही होते.

म्हणूनच, एखादं उत्पादन विकत घेताना त्याच्या मूळ स्त्रोताची खातरजमा करा. ब्रँडवर प्रेम करा, पण डोळस व्हा. आपला विश्वास कोणी विकत घेऊ नये, यासाठी सजग राहा…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -