Friday, October 17, 2025
Happy Diwali

जगातला सर्वात महागडा कुत्रा खरेदी करणाऱ्यावर ईडीची धाड

जगातला सर्वात महागडा कुत्रा खरेदी करणाऱ्यावर ईडीची धाड
बंगळुरू : कर्नाटकमधील बंगळुरू येथे राहणाऱ्या एस. सतीश यांनी काही दिवसांपूर्वी ५० कोटी रुपये मोजून वुल्फ डॉग अर्थात लांडग्यासारखा दिसणारा कुत्रा खरेदी केला. हा जगातला सर्वात महागडा कुत्रा असल्याचा एस. सतीश यांचा दावा आहे.
फक्त कुत्रा खरेदी करण्यासाठी ५० कोटी रुपयांची व्यवस्था करणाऱ्या एस. सतीश यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. नेटकऱ्यांप्रमाणेच ईडी अधिकाऱ्यांनाही हा प्रश्न सतावत आहे. ईडीच्या पथकाने एस. सतीश यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. सतीशने ईडीला स्वतःहून ज्या बँक खात्याची माहिती दिली त्या खात्यातून ५० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे दिसत नाही. यामुळे कुत्र्याच्या खरेदीसाठी हवालामार्फत आर्थिक व्यवहार झाला आहे का ? याची चौकशी ईडीने सुरू केली आहे. एस. सतीश या ५१ वर्षीय व्यक्तीने फेब्रुवारी २०२५ मध्ये एका दलालामार्फत वुल्फ डॉग अर्थात लांडग्यासारखा दिसणारा कुत्रा खरेदी केला. जगातील सर्वात दुर्मिळ म्हणून ओळखला जाणारा कॅडाबॉम्ब ओकामी प्रजातीचा हा कुत्रा फक्त आठ महिन्यांचा आहे. त्याचे वजन ७५ किलो आहे आणि उंची ३० इंच आहे. हा कुत्रा खरेदी करण्यासाठी ५० कोटी रुपये मोजल्याचे एस. सतीश यांनी सांगितले.
Comments
Add Comment