Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजकाँग्रेसचे संग्राम थोपटे भाजपाच्या वाटेवर

काँग्रेसचे संग्राम थोपटे भाजपाच्या वाटेवर

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. तर माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघात थोपटे कुटुंबाचे वर्चस्व आहे. भोर मतदारसंघ बारामतीचा भाग आहे. त्यामुळे थोपटे यांना आपल्याकडे खेचत भाजपा बारामतीत ताकद वाढवण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

Raigad : शेकापच्या जयंत पाटील यांच्या घरात फूट

राजकीय इतिहासातील नोंदी बघितल्या तर १९७२ ते २०२४ या ५२ वर्षांपैकी ४५ वर्षे भोर मतदारसंघाची आमदारकी थोपटेंच्या घरात दिसते. संग्राम थोपटेंचे वडील अनंतराव थोपटे १९७२ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी अपक्ष लढत बाजी मारली. नंतर १९७८ ते १९८० या कालावधीत भोरचं प्रतिनिधीत्व संपतराव जेधे यांनी केलं. यानंतर १९८० ते १९९९ अशी सलग १९ वर्षे अनंतराव थोपटे यांनी काँग्रेसकडून लढत विजय मिळवला.

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो जमिनी विकू नका, दलालांच्या भानगडीत पडू नका

शरद पवारांनी १९९९ मध्ये काँग्रेस सोडली. सोनिया गांधींच्या विदेशी असण्याला विरोध करत ते बाहेर पडले. यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधींनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ भोरमध्येच केला. त्यांनी थोपटेंचा प्रचार केला. शरद पवार समर्थक काशिनाथ खुंटवड यांनी निवडणूक जिंकली. पण ही निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवारांना खुंटवड यांच्या मागे मोठी ताकद लावावी लागली होती. अनंतराव थोपटे २००४ मध्ये पुन्हा निवडून आले होते. नंतर २००९ मध्ये अनंतरावांचे पुत्र संग्राम थोपटे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. यानंतर ते २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही विजयी झाले होते.

Raj Thackeray : अभ्यासक्रमात ‘हिंदी’ सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; सरकारला दिला थेट इशारा – ‘लादाल, तर संघर्ष अटळच!’

उद्धव यांनी भाजपासोबतची युती तोडून मविआसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्यात उद्धव सरकार आले. काँग्रेसचे नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष झाले. काही काळाने नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर संग्राम थोपटे विधानसभेचे अध्यक्ष होतील अशी चर्चा होती. पण ही चर्चा फक्त चर्चाच राहिली. थोपटे विधानसभेचे अध्यक्ष होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रयत्न केल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगली होती.

अनंतराव थोपटे यांच्या राजकीय प्रगतीत शरद पवारांनी अडचणी निर्माण केल्या तर संग्राम थोपटेंपुढे अजित पवारांचेच आव्हान आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटेंचा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला.

लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष झाला. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. त्यावेळी संग्राम थोपटे काँग्रेसचे आमदार होते. निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार जुने राजकीय हेवेदावे विसरुन संग्राम थोपटेंच्या घरी गेले होते. अजित पवारांसोबत असलेल्या संघर्षामुळे संग्राम थोपटे यांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंसाठी काम केले.संग्राम थोपटेंमुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भोर विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाली होती. सुनेत्रा अजित पवार यांच्या पराभवाला संग्राम थोपटे हे एक महत्त्वाचे कारण ठरले होते. आता संग्राम थोपटे भाजपाच्या वाटेवर आहेत. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यातील मोठा नेता हेरुन भाजपने पुढच्या विधानसभेत शतप्रतिशतसाठी तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -