मुंबई: यंदाच्या वर्षी अक्षय्य तृतीयेचा सण ३० एप्रिलला साजरा केला जात आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे सगळी शुभ कार्ये या दिवशी केली जातात. या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करणेही शुभ मानले जाते. या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी केल्यास लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहते.
मात्र अनेकदा सोने-चांदीसारख्या महागड्या गोष्टी या दिवशी खरेदी करणे सगळ्यांनाच जमत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या घरी आणल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील.
मातीची भांडी
या दिवशी मातीचे भांडे जसे की पाणी पिण्याचा घडा विकत घेतल्याने तसेच दान करणे शुभ असते.
जव अथवा गहू
जव आणि गहू हे अन्नपूर्णा देवीचे प्रतीक आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जव अथवा गहू खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात भरभराट होते.
तांदूळ
या दिवशी तुम्ही थोडेसे तांदूळ खरेदी करून ते पुजेमध्ये अर्पित करून त्यानंतर गरिबांना दान करू शकता. यामुळे घरात सुखसमृ्द्धी येते.
पूजेचे साहित्य
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी धूप, दीप, अगरबत्ती, चंदन तसेच इतर पुजेचे साहित्य करणे अतिशय शुभ मानले जाते.
पुस्तके आणि ज्ञानोपयोगी गोष्टी
ज्ञान हे अक्षय्य मानले जाते. यामुळे या दिवशी धार्मिक अथवा ज्ञानवर्धक पुस्तके खरेदी करणे अथवा वाचणे शुभ मानले जाते.
तुळशीचे रोप
तुळशीच्या रोपाचे हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. या दिवशी तुळशीत रोप लावल्याने अथवा त्याची सेवा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
श्रद्धेनुसार दान
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी गरिबांना, गरजूंना अन्न, वस्त्र अथवा धान्याचे दान केले तर ते पुण्यदायी ठरते.