Buldhana Water Shortage : बुलढाण्यात पाणीबाणी! दोन आठवड्यानंतर होतोय पाणीपुरवठा

पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता


बुलढाणा : गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा (Summer heat) चांगलाच वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून उन्हाच्या झळांचा (Heat Wave) नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना पाण्याची कमतरता भासत असून पाणीटंचाईचा (Water Crisis) देखील सामना करावा लागत आहे. मात्र अशातच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात पाणीबाणीचे संकट आले आहे. बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे जलसंकट अधिक तीव्र होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. (Water Shortage)



मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात ५०० हून अधिक गावात नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. शहरी भागात दहा ते बारा दिवसानंतर तर ग्रामीण भागात आठवडाभरानंतर पाणीपुरवठा होत आहे. तर सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर आणि चिखली तालुक्यात सर्वात जास्त गावांना पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. यामुळे गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन-तीन किलोमीटरवरून पायपीट करावी लागत आहे.



राज्यातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठी शिल्लक


महाराष्ट्रासमोर पाणीसंकट (Water crisis) उभे राहिले असून राज्यातील धरणांमध्ये एकूण ४१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे, यात पुण्यातील परिस्थिती सर्वात गंभीर आहे. पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या फक्त ३६.३१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. अद्याप पावसालाही अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले जात आहे.



उजनी धरण पुढील तीन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता 


पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणात (Ujani Dam) सध्या तीन टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये ६ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. (Water Shortage)


तवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के भरले होते. धरणाची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी असून यापैकी ६३ टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर ५४ टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवून क्षमतेच्या ६६ पूर्णांक ६५ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे.

Comments
Add Comment

Ishwarpur Name : मोठी बातमी, 'इस्लामपूर नव्हे, ईश्वरपूर! अखेर केंद्र सरकारचा नामकरणाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब, पत्र जारी

सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli District) इस्लामपूर (Islampur) शहराच्या नामकरणाच्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारची (Central Government)

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणात सरासरी ११.१ टक्के वाढ

ठाणे : नागरिकांनी याही वर्षी दिवाळी सण उत्साहाने साजरा केला असून याकाळात फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ

‘संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख’

नागपूर : सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींची नाराजी दूर, ७० लाख महिलांच्या अपात्रतेची भीती टळली; e-KYCच्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

मुंबई : राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा

लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक; ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता