पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता
बुलढाणा : गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा (Summer heat) चांगलाच वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून उन्हाच्या झळांचा (Heat Wave) नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना पाण्याची कमतरता भासत असून पाणीटंचाईचा (Water Crisis) देखील सामना करावा लागत आहे. मात्र अशातच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात पाणीबाणीचे संकट आले आहे. बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे जलसंकट अधिक तीव्र होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. (Water Shortage)
Mumbai Metro : मुंबईकरांच्या सेवेत येणार आणखी एक मेट्रो! मेट्रो लाईन २ बी मार्गावर आजपासून चाचणी
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात ५०० हून अधिक गावात नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. शहरी भागात दहा ते बारा दिवसानंतर तर ग्रामीण भागात आठवडाभरानंतर पाणीपुरवठा होत आहे. तर सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर आणि चिखली तालुक्यात सर्वात जास्त गावांना पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. यामुळे गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन-तीन किलोमीटरवरून पायपीट करावी लागत आहे.
राज्यातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठी शिल्लक
महाराष्ट्रासमोर पाणीसंकट (Water crisis) उभे राहिले असून राज्यातील धरणांमध्ये एकूण ४१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे, यात पुण्यातील परिस्थिती सर्वात गंभीर आहे. पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या फक्त ३६.३१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. अद्याप पावसालाही अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले जात आहे.
उजनी धरण पुढील तीन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता
पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणात (Ujani Dam) सध्या तीन टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये मायनसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये ६ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. (Water Shortage)
तवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के भरले होते. धरणाची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी असून यापैकी ६३ टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर ५४ टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवून क्षमतेच्या ६६ पूर्णांक ६५ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे.