Wednesday, April 16, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणBreaking News : वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करत नसाल तर, ही बातमी नक्की...

Breaking News : वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करत नसाल तर, ही बातमी नक्की वाचा

सिंधुदुर्ग : जे ग्रामस्थ आपल्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत, त्यांना सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायतीकडून कोणतेही कागदपत्र न देण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. जिल्ह्यात असा ठराव घेणारी कासार्डे ग्रामपंचायत एकमेव ग्रामपंचायत असल्याने या निर्णयाचा सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. सदरचा ठरावासाठी सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी गजानन कोलते यानी पुढाकार घेतला व नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत एकमुखी ठराव घेण्यात आला आहे. यावेळी माजी जि.प.सदस्य संजय देसाई, माजी उपसभापती प्रकाश पारकर, माजी सरपंच संतोष पारकर, तंटामुक्त अध्यक्ष श्रीरंग पाताडे, सर्व पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Delhi News : व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या महिलेचे लैंगिक शोषण, रुग्णालयात घडली धक्कादायक घटना

सध्या वृद्धाश्रमात वाढत असलेली वयोवृद्धांची संख्या पाहता हा निर्णय योग्यचा असल्याने हा ठराव ग्रामस्थांनी एकमुखी संमत केला आहे. त्याचबरोबर कासार्डे गावात व्यवसाय व काम करण्यासाठी येणारे परप्रांतीय फेरीवाले, भाजीपाला, भंगार विक्रेते, चिरेखाण कामगार, सिलिका कामगार यांनीही गावात येऊन व्यवसाय व काम करण्यापूर्वी प्रथम ग्रामपंचायत कासार्डे, पोलीस पाटील यांच्याकडे रितसर नोंदणी करून परवानगी घेतल्यानतंर गावात व्यवसाय व काम करण्याची मुभा राहील अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच वाढती गुन्हेगारी व सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील सर्व घरमालकांनी आपल्याकडे राहत असलेल्या भाडोत्र्यांची माहिती ग्रामपंचायतीकडे जमा करावी असेही सांगण्यात आले असून यामुळे गवातील सुरक्षेसाठी आधीच एक पाऊल ग्रामपंचायतीने घेतल्याने नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. यासाठी कासार्डे ग्रामपंचायतीने घेतलेले निर्णय जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना अनुकरणीय असल्याचे बोलले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -