
मुंबई : शेअर बाजार बुधवारी सेन्सेक्स वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स २८७ अंकांच्या वाढीसह ७७,०२१ वर बंद झाला. निफ्टी १०४ अंकांनी वाढून २३,४३३ वर बंद झाला. बँक निफ्टी ७२९ अंकांनी वाढून ५३,१०९ वर बंद झाला.
बुधवारी पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली. तर ऑटो आणि फार्मा शेअर्समध्ये विक्री झाली. मेटल आणि आयटी निर्देशांकातही थोडीशी वाढ दिसून आली. ट्रेडिंग सत्रात, स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांक देखील हिरव्या रंगात बंद झाले.
बाजारातील या सकारात्मक हालचालीचं मुख्य कारण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे (पीएसयू ) शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. बँक निफ्टी तब्बल ७२९ अंकांनी वधारत ५३,१०९ अंकांवर पोहोचला, जो या क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक ठरला.
दुसरीकडे, ऑटोमोबाईल आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये काही प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. याशिवाय स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्येही गुंतवणूकदारांचा उत्साह दिसून आला.