Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीरायगड जिल्हा शतप्रतिशत भाजपा होणार; रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

रायगड जिल्हा शतप्रतिशत भाजपा होणार; रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई : आगामी काळात रायगड जिल्ह्यात भाजपा शतप्रतिशत होणार असा विश्वास भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी व्यक्त केला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडितशेठ तथा सुभाष पाटील यांनी बुधवारी जि.प. माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, सवाई पाटील यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी खा. धैर्यशील पाटील, आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, अविनाश कोळी, कमलाकर दळवी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश आणि राज्य विकासाच्या वाटेवर वेगाने जात आहे. या दोघांवर असलेल्या विश्वासामुळे श्री. पाटील यांनी शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. श्री. पंडितशेठ पाटील हे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात पक्षसंघटनेला अधिक ताकद मिळणार आहे. श्री. पाटील यांचा पक्षात यथोचित सन्मान राखला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याचा सर्वांगीण विकास होणार याची हमी असल्याने आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे श्री. सुभाष पाटील यांनी सांगितले. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपाच्या साथीने आगामी काळात जोमाने कार्य करून जिल्ह्यात भाजपाला क्रमांक एक चा पक्ष बनवू असा शब्द ही श्री. पाटील यांनी दिला.

माजी आमदार दिवंगत मीनाक्षी पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा बॅंकेचे संचालक आस्वाद पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे ६ माजी सभापती, ७ जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा बँकेचे दोन संचालक, आजी माजी ६० सरपंच यांसह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. शेकापमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये जनार्दन पाटील, सुगंधा पाटील, संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, भावना पाटील, संदीप घरत, एकनाथ गायकवाड, वैभव चांदे, वसंत यादव, राजा सानप, स्मिता पाटील, महादेव दिवेकर आदींचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -