Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीMS Dhoni : एमएस धोनी दिसणार रोमँटिक अवतारात; जाणून घ्या काय आहे...

MS Dhoni : एमएस धोनी दिसणार रोमँटिक अवतारात; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार क्रिकेटपटू एमएस धोनी नेहमीच क्रिकेटच्या मैदानावर आपल्या स्टाईलने चाहत्यांना खुश करतो. याचं क्रिकेटच्या मैदानात तो एक उत्तम बाबा आणि नवरा असल्याचं अनेकदा व्हिडिओ मधून पाहायला मिळालं. आता धोनी क्रिकेटच्या मैदानात नाही तर एका नव्या अंदाजात जाहिरातीत दिसणार आहे. तो कायम पडद्यावर छोट्या छोट्या भूमिकांमध्ये दिसत असतो. आता धोनी एका नवीन प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. निर्माता करण जोहरने नुकतीच एक खास पोस्ट केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Mumbai News : चोरीचं गूढ महापालिकेच्या कचरा गाडीने उलगडलं!

करण जोहरच्या आगामी प्रोजेक्टमध्ये एमएस धोनी ‘लव्हर बॉय’ची भूमिका साकारणार आहे. याची हटके झलक करणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दिली आहे. यातून धोनीचा एक नवीन लूक आणि अवतार समोर येणार आहे. करणने शेअर केलेल्या व्हिडीओत क्रिकेटपटू एमएस धोनी रोमँटिक अंदाजात दिसत आहे. व्हिडीओच्या सुरूवातीलाच ‘पहिल्यांदाच एमएस धोनी रोमँटिक अवतारात’ असे लिहिलेले पाहायला मिळत आहे.

व्हिडीओमध्ये धोनीच्या हातात हार्टच्या आकाराचा फुगा पाहायला मिळत आहे. तो म्हणतो की, “तू सोबत असतेस तेव्हा प्रत्येक प्रवास सुंदर बनतो. ” या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते धोनीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर आहेत. एमएस धोनी करण जोहरच्या नवीन जाहिरातील दिसणार आहे. याची एक झलक करणन चाहत्यांसोबत शेअर केली आहे. याआधी देखील धोनीने अनेक जाहिरातीमध्ये काम केले आहे. मात्र ही जाहिरात खास असणार आहे. कारण यात धोनीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -