Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेThane News : इंग्रजी शाळेत फक्त इंग्रजीतच बोला सांगणाऱ्या शाळांना मनसे स्टाईल...

Thane News : इंग्रजी शाळेत फक्त इंग्रजीतच बोला सांगणाऱ्या शाळांना मनसे स्टाईल उत्तर

ठाणे : महाराष्ट्रात मराठीच्या गळचेपीच्या घटनांची मालिका काही थांबेना. ठाण्यातील इंग्रजी शाळांमध्ये मराठी बोलण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी विद्यार्थ्यांना वर्गात मराठीऐवजी इंग्रजी बोलण्याचा दबाव आणला होता. या शाळेला मनसेने मनसे स्टाईलने उत्तर देत दणका दिला आहे.

Mumbai News : चोरीचं गूढ महापालिकेच्या कचरा गाडीने उलगडलं!

सध्या मराठी भाषेचा वाद महाराष्ट्रात मिटल्या मिटत नाही आहे. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटनांमध्ये मराठी भाषेची गळचेपी होतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच ठाणे जिल्ह्यातील सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी विद्यार्थ्यांना वर्गात, शाळेच्या आवारात मराठी बोलण्यावर बंदी घातली होती. तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी बोलल्याबद्दल अपमानित केले जात असल्याची राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेकडे याबाबत तक्रार केली होती. मंगळवारी (दि १५ ) शाळेत विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यापासून रोखल्यास कारवाई करण्याचा इशारा परिषदेने दिला. त्यानुसार जिल्हा परिषदेने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली.

परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, सर्व शाळांनी मराठी भाषेचा वापर आणि आदर राखणे जरुरीच आहे. जर कोणत्याही शाळेने फक्त इंग्रजी बोलण्याचे धोरण राबवले तर त्या शाळांवर कारवाई केली जाईल. तसेच मराठी भाषेचा वापर केवळ भाषेच्या तासातच करू नये. त्याऐवजी, ते दैनंदिन संभाषणांमध्ये, वर्गातील चर्चांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, नाटकांमध्ये आणि भाषण स्पर्धांमध्ये वापरले गेले पाहिजे. शिक्षण विभागाच्या या आदेशाचे मनसेने स्वागत केले आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या भाषिक असमतोलाला रोखण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल असल्याचे म्हटले. जिल्हा परिषदेच्या या निर्णयाचं मनसेकडून कौतुक करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -