Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीMahadnyandeep Portal : महाज्ञानदीप पोर्टल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लाँच

Mahadnyandeep Portal : महाज्ञानदीप पोर्टल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लाँच

मुंबई : डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली आहे. महाज्ञानदीप या पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण होणार आहे. महाराष्ट्र शासनाने ‘महाज्ञानदीप’च्या रुपाने देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू केले आहे; असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ते मुंबईत महाज्ञानदीप या पोर्टलच्या लाँचिंग सोहळ्यात बोलत होते. मंत्रालयात महाज्ञानदीप पोर्टलचा शुभारंभ झाला. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सजीव सोनवणे, आयआयटी गांधीनगरचे प्रा. समीर सहस्त्रबुद्धे तसेच राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे संचालक, पत्रकार आणि अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

Mumbai : मुंबईतील फेरीवाल्यांची समस्या कर्करोगासारखी, महापालिका आयुक्तांनी नागरिकांना केले आवाहन

महाज्ञानदीप उपक्रमांतर्गत एक हजार MOOC तज्ज्ञ प्राध्यापक घडवण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत १५० प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-2020) अंतर्गत ‘भारतीय ज्ञान प्रणाली – जेनेरिक’ (IKS – Indian Knowledge System – Generic) हा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार केला आहे. हा अभ्यासक्रम या पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑनलाईन सहज एका क्लिकवर उपलब्ध होईल. या उपक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -