Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Pune News : पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या!

Pune News : पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या!

पुणे : पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मण साधू शिंदे या पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या करण्यात आली आहे. कामानिमित्त पाटणा येथे गेलेल्या लक्ष्मण शिंदे यांचा १४ एप्रिल रोजी बिहारमध्ये मृतदेह आढळून आला.



मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड येथे राहणाऱ्या लक्ष्मण साधू शिंदे यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. ते पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिक होते. सायबर चोरट्यांनी कंपनीच्या कामासाठी मेल करत त्यांना पाटण्यात बोलवून घेतले. कंपनीचे काही टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो असा मेल आरोपींनी लक्ष्मण शिंदे यांना पाठवला होता. स्वस्तात मशिनरी मिळेल असा विचार करुन शिंदे बिहारला गेले होते. त्यानंतर एअरपोर्टवरून त्यांचे अपरहण करण्याता आले. अपरहणानंतर त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चोरटयांनी त्यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे.


आरोपींनी शिंदे यांचा मृतदेह जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झुंकी आणि मानपूर गावादरम्यान येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग- ३३ वर फेकून दिला. मृतदेह फेकल्यानंतर आरोपी फरार झाले. पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यामध्ये शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबाकडून देण्यात आली होती. सोमवारी (दि १४) पाटण्यात त्यांचा मृतदेह सापडला. बिहारच्या स्पेशल टीमने याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. हत्या झाल्यानंतर बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने पाच संशयितांना जहानाबाद आणि नालंदा या जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment