Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीKonkan Hapus : दिल्लीकर कोकणातल्या हापूसची चव चाखणार!

Konkan Hapus : दिल्लीकर कोकणातल्या हापूसची चव चाखणार!

आंबा महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

नवी दिल्ली : सर्वानांच उन्हाळ्याचा (Summer Season) कंटाळा येतो. उन्हाळा येतोच का? असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित राहतो. मात्र आंब्याचं नाव काढलं की तोच उन्हाळा सुसह्य होण्याची शक्यता वाढते. आंबा आवडत नाही असा माणूस विराळाच. कोकणातील हापूसची (Konkan Hapus) चव ही प्रत्येक आंबाप्रेमीच्या जीभेवर रेंगाळते, अगदी परदेशातही हा आंबा जातो. आता याच हापूसची चव देशाच्या राजधानीतल्या लोकांना अर्थात दिल्लीकरांनाही (Delhi) चाखता येणार आहे. कशी आणि कुठे? अहो खुद्द दिल्लीत, कारण राजधानी दिल्लीमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून या दिमाखदार महोत्सवाचे उद्घाटन खुद्द देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते होणार आहे.

Buldhana Water Shortage : बुलढाण्यात पाणीबाणी! दोन आठवड्यानंतर होतोय पाणीपुरवठा

दिल्ली महाराष्ट्र सदन येथे आयोजित आंबा महोत्सवाचे (Delhi Mango Festival) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार असून ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या अभिनव संकल्पनेच्या मध्यमातून दिल्ली येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल व १ मे असे दोन दिवस आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असन दिल्लीकरांना अस्सल देवगड, रत्नागिरी हापूस आंब्याची तसेच अन्य कोकणी उत्पादनांची चव चाखायला मिळणार आहे. तसेच या दोन दिवसांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र दिनी चाखता येणार (Maharashtra Day)

हापूसची चव कोकणातील देवगड व रत्नागिरीतील हापूस आंबा महाराष्ट्रात व देशभरात खूपच प्रसिद्ध आहे. कोकणातील शेतकऱ्यांना विविध राज्यांमध्ये थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, आंब्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी, या उदात्त हेतूने खासदार वायकर यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये ३० एप्रिल ते १ मे (महाराष्ट्र दिन) पर्यंत आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाला केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच देशाच्या विविध राज्यातील खासदार व आमदारही उपस्थित राहणार आहेत.

मुंबईतील खासदार रविंद्र वायकर यांनी आंबा महोत्सवाचे नियोजन करून या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व्हावे यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्यानुसार त्यांनी आंबा महोत्सवाच्या उद्घाटनास वेळ दिली आहे. प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटी दरम्यान व्यक्त केले होते. दिल्लीतील जास्तीत जास्त आंबा प्रेमीनी या महोत्सवाला भेट देऊन कोकणातील आंबा, अन्य उत्पादकांना तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन खासदार रविंद्र वायकर यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -