
/>
अमेरिकेने सुधारित आयात शुल्क (टॅरिफ) धोरण जाहीर केले. यानंतर भारतासह अनेक देशांनी आयात शुल्क या मुद्यावर अमेरिकेशी बातमीत करण्याची तयारी दाखवली. यामुळे अमेरिकेने संबंधित देशांवरील वाढीव आयात शुल्काचा निर्णय स्थगित केला. पण चीनने अमेरिकेच्या सुधारित आयात शुल्क (टॅरिफ) धोरणाला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या चीनमध्ये आयात होणाऱ्या मालावर (वस्तू आणि सेवा) वाढीव आयात शुल्क लागू केले. या निर्णयाचे पडसाद उमटले. अमेरिकेने चिनी मालावर एकूण २४५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू होईल, असे जाहीर केले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीने नवा आदेश जारी झाला.
/>
ट्रम्प यांनी सुधारित आयात शुल्क (टॅरिफ) जाहीर करण्याआधी चिनी मालावर अमेरिकेत वीस टक्के आयात शुल्क लागू होते. ट्रम्प यांनी चिनी मालावर आधी १२५ टक्के आयात शुल्क लागू केले. यामुळे चीनवरील एकूण आयात शुल्क १४५ टक्के झाले. आता यात आणखी १०० टक्क्यांची वाढ करुन अमेरिकेने चिनी मालावर (वस्तू आणि सेवा) एकूण २४५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू होईल, असे जाहीर केले.