Thursday, May 8, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Delhi News : व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या महिलेचे लैंगिक शोषण, रुग्णालयात घडली धक्कादायक घटना

Delhi News : व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या महिलेचे लैंगिक शोषण, रुग्णालयात घडली धक्कादायक घटना

दिल्ली : विमान कंपनीत काम करणाऱ्या महिलेचे रुग्णालयात लैंगिक शोषण करण्यात आले. ही महिला व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्यावर लैंगिक शोषण केले. महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, खासगी विमान कंपनीत काम करणारी महिला गुरुग्राम या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आली होती. त्यावेळी ती एका हॉटेलमध्ये राहत होती. हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना तिला श्वास घेणं कठीण झालं होतं. त्यानंतर या महिलेला गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेला उपचारासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. एप्रिल महिन्याच्या सुरवातीला ही महिला रुग्णालयात दाखल झाली होती.


/>

महिला व्हेंटिलेटरवर होती आणि अर्धवट शुद्धीत आली होती. पण जास्त हालचाल करू शकत नव्हती. याच सुमारास ६ एप्रिल रोजी तिचे लैंगिक शोषण झाले. व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिचे लैंगिक शोषण केले. ही घटना घडली त्यावेळी तिथे दोन परिचारिकाही उपस्थित होत्या; असा गंभीर आरोप महिलेने केला आहे.


महिलेने ही माहिती १३ एप्रिल रोजी डिस्चार्ज मिळाल्यावर कुटुंबियांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. दरम्यान या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Comments
Add Comment