मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी चाहत्यांना खुशखबर दिली आहे. झहीर -सागरिका आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोघांनी सर्वांसोबत ही गोड बातमी शेअर केली आहे. जहीर-सागरिकाला मुलगा झाला असून त्या तिघांचा एक खास फोटो पोस्ट करत मुलाचं नावही त्यांनी जाहीर केलं आहे.
सागरिकाने बाळाची पहिली झलक दाखवत एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यामध्ये तिने बाळाचं नावंही सांगितलं आहे. ‘प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादासह आम्ही आमच्या मुलाचे, फतेहसिंह खान याचे स्वागत करत आहोत.’ असं सागरिकाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. सागरिकाच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
Summer Lip Care : उन्हाळ्यातसुद्धा ओठ फुटतात? या ‘टिप्स’ फॉलो करा
ब्लॅक अँड व्हाईटमध्ये २ फोटोंसह अशी कॅप्शन लिहीत त्यांनी मुलाचं नाव सर्वांना सांगितलं आहे. एका पोस्टमध्ये सागरिका-झहीर आणि त्याच्या कुशीत झोपलेला लेक दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये नवजात बाळाचं बोट पकडलेला क्लोज अप फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टवर आणि फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत असून अनेकांनी कमेंटसमध्ये त्यांचं अभिनंदन करत लहान बाळालाही आशिर्वाद दिले आहेत.
View this post on Instagram
IPL २०२५ मध्ये व्यस्त जहीर खान
जहीर खान सध्य़ा आयपीएल २०२५ मध्ये व्यस्त आहे. या सीझनमध्ये तो लखनऊ सुपर जायंट्स चा बॉलिंग कोच आहे. आयपीएलमध्ये लखनऊने आत्तापर्यंत ७ सामने खेळले असून त्यापैकी ४ जिंकले तर ३ हरले. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये झहीर खानची टीम ५ व्या स्थानी आहे. आयपीएल २०२५ मधील पुढील सामना १९ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल.
अभिनेत्री सागरिकाने २०१७ मध्ये क्रिकेटर असलेल्या झहीर खानशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर ८ वर्षांनी त्यांच्या घरात पाळणा हलला आहे. ३९व्या वर्षी सागरिका पहिल्यांदा आई झाली आहे. त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.