मुंबई : ‘ज्वेल थीफ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. त्यावेळी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत एक विचित्र घटना घडली. तो स्टेजवर खुर्चीवर बसायला गेला आणि त्याला काही तरी टोचले. अचानक काहितरी टोचल्याने घाबरलेला सैफ जोरात ओरडला. तेव्हा सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. सगळे प्रेक्षक घाबरले. पण काही क्षणातच सैफला त्याची चूक लक्षात आली आणि तो स्वत:च जोरात हसला. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांचा जीव भांड्यात पडला.
Mumbai : मुंबईतील फेरीवाल्यांची समस्या कर्करोगासारखी, महापालिका आयुक्तांनी नागरिकांना केले आवाहन
अभिनेता सैफ अली खान सर्वाधिक चर्चेत आला तो म्हणजे त्याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे. आता तो त्याच्या नवीन चित्रपटासाठी परत एकदा तयारीनिशी प्रेक्षकांसमोर आला आहे.
‘पाताल लोक’ फेम अभिनेता जयदीप अहलावतने याआधी करीना कपूरसोबत काम केलं होतं. आता तो सैफ अली खान सोबत काम करत आहे. या चित्रपटाचे नाव ‘ज्वेल थीफ’ आहे. सोमवारी याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलर लाँचच्या दरम्यान सैफसोबत विचित्र घटना घडली.
सैफच्या हातात एक लाल हिरा दिसला. सुरुवातीला, प्रमोशनदरम्यान सैफने तो हिरा सर्वांना दाखवला आणि हि-यासोबत फोटो काढताना भरपूर पोझही दिल्या. पोझ दिल्यानंतर, त्याने तो हिरा त्याच्या जीन्सच्या मागच्या खिशात ठेवला.
त्यानंतर तो स्टेजवर गेला आणि खुर्चीवर बसायला लागला तेव्हा तो हिरा त्याला टोचला आणि तो दचकून जोरात ओरडला. चाकू हल्ल्यामुळे आधीच चर्चेत असलेला सैफ ओरडल्याने सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली. पण त्यानंतर त्याच्यासह सर्वांच्याच जेव्हा खरा प्रकार लक्षात आला तेव्हा सगळे जोरजोरात हसायला लागले. या प्रसंगाचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.