मुंबई : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाने २०२५ मध्ये सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या सिनेमाने सर्व प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ज्या सीनसाठी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता तो सीन काढून टाकल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मात्र आता हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकाराने समाज माध्यमांवर पोस्ट करत छावा चित्रपट वाईट असल्याचं म्हटलं आहे.
Dombivli News : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाला टाळे लावण्याचा मनसेचा इशारा !
मिळालेल्या माहितीनुसार, छावा या चित्रपटाने अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मागे टाकले आहे. या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन हिट झाल्यावर हा सिनेमा तामिळ भाषेतही प्रदर्शित करण्यात आला होता. सिनेमाने केवळ भारतात ६०० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. या चित्रपटाने काहींच्या मनावर राज्य केले तर काही अंशी प्रेक्षकांना हा सिनेमा खटकला असल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. मराठी कलाकार आस्ताद काळे याने या चित्रपटात ‘सूर्या’ ही भूमिका साकारली आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर जवळपास २ महिन्यांनी आस्तादने फेसबुक पोस्ट शेअर करत या सिनेमातील खटकलेले मुद्दे उपस्थित केले आहेत.
अभिनेत्याने एकूण ५ पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये आस्तादने “हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं? काय पुरावे आहेत याचे? मी आता खरं बोलणार आहे…छावा वाईट फिल्म आहे, फिल्म म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी प्रॉब्लेमॅटिक आहे. सर्वतोपरी वाईट आहे.” अभिनेता पुढे लिहितो, “औरंगजेबाचं वय आणि आजारपण बघता, तो या वेगाने चालू शकेल? सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार एका नदीकाठी? असं नाही व्हायचं हो! सोयराबाई राणी सरकार या परपुरुषासमोर बसून पान लावतायत? आणि ते खातायत? हे कसं चालतं?” असे मुद्दे या पोस्टद्वारे आस्तादने उपस्थित केले आहेत. दरम्यान आस्तादच्या या पोस्ट नंतर नवा वाद उफाळणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.