Wednesday, April 16, 2025
Homeक्राईमSaif Ali Khan : ३० हजारासाठी केला सैफवर हल्ला! पोलिसांचा आरोपपत्रात खुलासा

Saif Ali Khan : ३० हजारासाठी केला सैफवर हल्ला! पोलिसांचा आरोपपत्रात खुलासा

मुंबई : काही महिन्यांपूर्वी बॅालीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) मध्यरात्री २ वाजून ३० मिनिटांच्या सुमारा चाकूहल्ला झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली असून याप्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक गोष्टींचा उलगडा होत असताना आता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा झाला आहे. (Saif Ali Khan Attack)

Thane News : ठाणे पूर्वेतील मिठागरात आलाय ठिपक्यांचा टिलवा!

सैफच्या घरात घुसलेला या बांगलादेशी आरोपीला बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळवण्यासाठी ३० हजार रुपये चोरायचे होते अशी माहिती मुंबई पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, मोहम्मद शहजाद यांने पोलिसांना सांगितले की तो फक्त भारतीय पासपोर्ट मिळवण्याच्या उद्देशाने भारतात आला होता.

त्याने सांगितले की, बांगलादेशी नागरिकांच्या तुलनेत भारतीय नागरिक म्हणून परदेशातील वर्क व्हिसा मिळवणे सोपे जाते. त्याला आधी आधार आणि पॅन कार्ड मिळवायचे होते आणि त्यानंतर तो पासपोर्टसाठी अर्ज करणार होता. शहजाद याने पोलिसांना सांगितले की तो बांगलादेशातील झालकाठी जिल्ह्यातील रहिवासी असून सैफवर हल्ला झाला त्याच्या आठ महिन्यांपूर्वी तो बेकायदेशीर पद्धतीने भारतात आला होता. तो १५ दिवस कोलकाता येथे राहिला त्यानंतर गितांजली एक्स्प्रेसने प्रवास करून तो मुंबईला आला. (Mumbai News)

नेमके प्रकरण काय ?

सैफ अली खान व करिना कपूर हे वांद्रे येथील सदगुरु अपार्टमेंटध्ये बाराव्या मजल्यावर राहतात. १५ जानेवारी रोजी रात्री उशीरा सैफ अली खानच्या घरी अज्ञाताने प्रवेश केला. त्याच्या मोलकरणीसोबत वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप केला तेव्हा, त्या व्यक्तीने सैफवर चाकूने हल्ला केला. त्यात सैफ गंभीर जखमी झाला. त्यानंतर पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आरोपीची माहिती

अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीने त्याचा गुन्हा कबुल केला. मोहम्मद शहजाद असे त्याचे नाव असून तो बांगलादेशी रहिवासी आहे. मुंबईत नोकरीच्या शोधात आलेल्या मोहम्मद शहजादला ५० हजारांची गरज असल्याने त्याने सैफ अली खानच्या घरी चोरी करण्याचा प्लॅन आखल्याचे मान्य केले. आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -