पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील हलगर्जीपणाची बातमी ताजी असतानाच बीड जिल्हा रुग्णालयाचा ढोबळ कारभार समोर आला आहे. बीड जिल्हा रुग्णालयात रविवारी (दि १३) एका मातेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. त्यानंतर काल (दि १४) पुन्हा प्रसूतीनंतर आणखी एक माता मृत पावली. या घटनेने जिल्हा रुग्णालयात नेमकं चाललय काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Ladki Bahin Yojana : ‘या’ लाडक्या बहिणींना १५०० नव्हे फक्त ५०० रुपये मिळणार
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या जिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी एका मातेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता चौकशीसाठी त्रिसदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे. छाया पांचाळ असं मृत मातेचे नाव होते. या मातेच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. याची दखल घेत पाच सदस्य समिती समोर छाया पांचाळ यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या चौकशी समिती समोर जाण्याआधीच स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून कागदपत्रे बदलल्याची चर्चा रुग्णालयात सुरू आहे. त्यानंतर काल (दि १४) सकाळी आणखी एका मातेची प्राणजोत मालवली.या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. या घटनेला नेमकं कोण जबाबदार आहे याची अधिक चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान या मृत्यूनंतर बीड जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा ही व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येत आहे.