Friday, May 9, 2025

क्रीडाIPL 2025महत्वाची बातमी

PBKS vs KKR, IPL 2025: घरच्या मैदानावर कोलकत्त्याविरुद्ध पंजाबचे 'बल्ले बल्ले', १६ धावांनी मिळवला विजय

PBKS vs KKR, IPL 2025:  घरच्या मैदानावर कोलकत्त्याविरुद्ध पंजाबचे 'बल्ले बल्ले', १६ धावांनी मिळवला विजय

मोहाली: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३१व्या सामन्यात आज पंजाबच्या मैदानावर जबरदस्त सामना पाहायला मिळाला. खरंतर जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला आव्हान फारच छोटे होते. मात्र न भूतो न भविष्यती अशी कामगिरी पंजाब किंग्सने करून दाखवली. घरच्या मैदानावर पंजाब किंग्स संघाचा जलवा पाहायला मिळाला.


आज कोलकत्ता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबने १६ धावांनी विजय मिळवला आहे. पंजाबने विजयासाठी केवळ ११२ धावांचे आव्हान कोलकत्ता नाईट रायडर्सला दिले होते. मात्र इतके छोटे आव्हानही कोलकत्त्याला पेलता आले नाही. त्यांचे एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले आणि संपूर्ण संघ अवघ्या ९५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.


या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पंजाबचा संघ संपूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. १६व्या षटकांतच १११ धावांवर त्यांचा डाव आटोपला. कोलकत्त्याकडून हर्षित राणाने ३ विकेट मिळवल्या तर वरूण चक्रवर्ती आणि सुनील नरेनने प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.


एकूण धावसंख्या पाहता कोलकत्ता सहज हे आव्हान पार करेल असे वाटत होते. मात्र केकेआरचा संघ मैदानावर सुरूवातीपासूनच दबावात दिसला. चहलच्या फिरकीसमोर रहाणेच्या टीमचे काही चालले नाही. पंजाबच्या गोलंदाजांनी कोलकाताला ११२ धावाही करू दिल्या नाहीत. कोलकत्त्याचा संघ १६व्या षटकांत ९५ धावांवरच तंबूत परतला. पंजाबकडून चहलने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.


Comments
Add Comment