१५ दिवसात येणार नवी पॉलिसी
मुंबई : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील दादर येथे डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करुन अमर हिंद मंडळाच्या ७८व्या व्याख्यानमालेत उपस्थितीत दर्शवत मार्गदर्शन केले. बाबासाहेबांचे जीवन सामाजिक आर्थिक समतेसाठी महत्त्वाचे आहे. कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी लोकप्रबोधन महत्त्वाचे आहे, विचारमंथन आवश्यक आहे. पण, आपल्या देशात विचार भिन्नतेपेक्षा विचारशून्यता असल्याची खंत गडकरी यांनी व्यक्त केली. येथील वाख्यानमालेत बोलताना त्यांनी देशभरातील रस्ते, पूल, टोलनाके आणि भावी प्रकल्पांबाबत माहिती दिली. तर, टोलबाबत मी जास्त सांगणार नाही, पण तुम्हाला लवकरच १५ दिवसांच्या आत अशी पॉलिसी येईल, की टोलबाबत तुमची कोणतीही तक्रार राहणार नाही, अशी केंद्रीय मंत्री गडकरींनी घोषणाच केली.
टोलबाबत मी जास्त सांगणार नाही, पण तुम्हाला लवकरच १५ दिवसांच्या आत अशी पॉलिसी येईल, की टोलबाबत तुमची कोणतीही तक्रार राहणार नाही. पण मी महाराष्ट्राच्या टोलबाबत बोलत नाही, NHI राष्ट्रीय महामार्गाबाबत बोलतोय, असे नितीन गडकरी यांनी म्हंटल. आता टोलनाके राहणार नाहीत, पण सॅटेलाईट सिस्टीमद्वेरा तुम्ही तिथून निघाल्यानंतर तुमच्या नंबरप्लेटवरुन तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसे कपात होतील, अशी माहिती देखील नितीन गडकरी यांनी दिली. तसेच, पुढच्या २ वर्षात इंडियन रोड इनफ्रा अमेरिकेपेक्षा चांगले राहील असेही ते म्हणाले. तसेच, मुंबई-गोवा महामार्ग जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.
Summer Lip Care : उन्हाळ्यातसुद्धा ओठ फुटतात? या ‘टिप्स’ फॉलो करा
टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्याकरता सरकार पातळीवर अनेक उपाययोजना आणल्या जात आहेत. त्याकरता फास्ट टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली आहे. फास्टटॅगकरताही टोलनाक्यावर गाड्यांना बराच काळ रांगेत उभे रहावे लागते. यासाठी देशातील टोलनाकेच आता बंद व्हावेत, याकरता केंद्र सरकारने नवी यंत्रणा राबवण्याचा विचार केला आहे. असे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, “सॅटलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम तयार करतोय. यामुळे टोलनाके राहणार नाहीत. तुम्हाला कोणी अडवणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल निघेल. तुम्ही जिथून निघालात तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाणार आहे.” तसेच या नवीन धोरणात, सरकार लोकांना तीन हजार रुपयांमध्ये फास्टॅग रिचार्ज करण्याची सुविधा देणार आहे. त्यानंतर त्यांना पुढील एक वर्षासाठी कोणत्याही टोल प्लाझावर कर भरावा लागणार नाही असे त्यांनी सांगितले.