
वॉशिंगटन : अमेरिका पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हदरली आहे. अमेरिकेच्या दक्षिण कालिफोर्निया शहराजवळील सॅन डिएगोत सोमवारी (दि.१४) ५.२ तीव्रतेचा भूकंप झाला.यामध्ये सध्या कोणतीही जीवीत किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्रबिंदू सॅन डिएगोच्या पूर्वेकडे ज्युलियनच्या पर्वतीय भागात होते.
भूकंपाचा झटका सॅन डिएगोच्या काउंटीमध्ये जाणवला. याचे परिणाम लॉस एंजलिसच्या उत्तरेकडील कॉउंटपर्यंत जाणवला. रिपोर्टनुसार, ५.२ तीव्रतेच्या भूकंपानंतरही आणखी काही भूकंपाचे झटके जाणवले. सॅन डिएगोच्या जवळील ज्युलियन या डोंगराळत भागला भूकंपाचा मोठा फटका बसला. या डोंगराळ भागातील लोकसंख्या सुमारे १५०० आहे. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, सॅन डिएगोमधील भूकंपामुळे ज्युलियन येथे लोकांच्या घराच्या खिडक्या आदळल्या.शिवाय, माजी खाण मालक नेल्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे ईगल मायनिंग कंपनीच्या गिफ्ट शॉपमधील फोटो फ्रेम देखील पडले. तथापि, पर्यटक वापरत असलेल्या बोगद्यांमध्ये कोणतेही नुकसान झाल्याची माहिती नाही.

१५ दिवसात येणार नवी पॉलिसी मुंबई : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील दादर येथे डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करुन अमर हिंद ...
यापूर्वी रविवारी (१३ एप्रिल) देखील भूकंपाचे धक्क जाणवले होते. यादरम्यान सुमारे दोन डझन खाणकामगार खाणीत होते. तसेच सोमवारी झालेल्या सॅन डिएगो काउंटीमधील भूकंपामुले कॅलिफोर्नियाच्या वनीकरण आणि अग्निशमन संरक्षण विभागाने खबरदारी म्हणून शाळेतील मुलांना इमारतींमधून बाहेर काढले आणि घरी पाठवण्यात आले. सॅन डिएगो काउंटी शेरीफ विभागाने सांगितले की, सध्या या भूकंपात कोणतीही जीवीत किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु सध्या परिसरात भितीचे वातावरण पसरलेले आहे.