मुंबई: कडिपत्त्याचा वापर प्रामुख्याने जेवण करताना फोडणीसाठी केला जातो. मात्र आयुर्वेदाच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने शरीरास अनेक फायदे होतात. नियमितपणे रिकाम्या पोटी कडिपत्त्याचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होऊ शकतात. जाणून घेऊया याचे फायदे…
वजन होते कमी
कडिपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्समुळे शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते. तसेच मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. तसेच रिकाम्या पोटी कडिपत्ता खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतो.
कडिपत्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉल बाहेर निघते.
डोळ्यांचे आरोग्य राहते चांगले
कडिपत्त्यामध्ये व्हिटामिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
त्वचेचे विकार होतात दूर
कडिपत्त्यामध्ये अँटी बॅक्टेरियल तसेच अँटी फंगल गुण असतात ज्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतात. पिंपल्स, फोड, पुटकळ्या, डाग बरे होतात.