Thursday, April 17, 2025
Homeताज्या घडामोडीBank Of Baroda Recruitment : BOB बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! १४६ पदांची भरती;...

Bank Of Baroda Recruitment : BOB बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! १४६ पदांची भरती; मिळणार लाखो रुपयांचा पगार

मुंबई : सध्या अनेक तरुण भरघोस पगाराच्या सरकारी नोकरीच्या शोधात असतात. अशाच तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बँक ऑफ बडोदाने वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी भरती जारी (Bank Of Baroda Recruitment) केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून आज अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, २२ ते ५७ वयोगटातील उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज सादर करु शकतात. जाणून घ्या याबाबतची इतर माहिती.

Saie Tamhankar : ‘आलेच मी’ म्हणत सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!

शैक्षणिक पात्रता 

  • मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर पदवी
  • २ वर्षांची पदव्युत्तर पदवी/ व्यवस्थापन पदविका आणि नियामक प्रमाणपत्र
  • संबंधित क्षेत्रात १ ते १२ वर्षांचा अनुभव

अर्ज शुल्क

  • सामान्य, ईडबल्यूएस, ओबीसी : ६०० रुपये + जीएसटी
  • एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, महिलाा : १०० रुपये + जीएसटी

निवड प्रकिया 

  • उमेदवारांची निवड शार्टलिस्टिंग आणि नंतर वैयक्तिक मुलाखत किंवा इतर कोणत्याही निवड प्रक्रियेच्या आधारे केली जाईल.
  • मुलाखत/निवड प्रक्रियेतील पात्रता गुण बँक ठरवेल.

वेतन

उमेदवाराला ६ ते २८ लाख रुपये वार्षिक वेतन दिले जाईल.

असा करा अर्ज

  • www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • होम पेजवर ‘करिअर’ टॅबवर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडल्यावर ‘करंट ओपनिंग’ टॅबवर क्लिक करा.
  • नोंदणी करा आणि फॉर्म भरा.
  • अर्ज शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा. त्यानंतर फॉर्मची प्रिंट काढून ठेवा. (Bank Of Baroda Recruitment)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -