जम्मू : जगप्रसिद्ध अमरनाथ यात्रेला यंदा ३ जुलै पासून सुरू होत आहे. यासाठी नावनोंदणी प्रक्रिया १४ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. यावर्षी ही यात्रा जवळपास ५२ दिवस चालणार आहे. आगामी ९ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या यात्रेच्या अनुषंगाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था राहणार आहे.
जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ५ मार्च रोजी राजभवन येथे झालेल्या श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या ४८व्या बैठकीत या वर्षीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. यावेळीही यात्रा अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम मार्ग आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गावरून एकाच वेळी सुरू होईल. प्रवाशांची अपेक्षित गर्दी लक्षात घेता, मंडळाने यावर्षी व्यवस्था आणि सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्याचे प्रस्ताव दिले आहेत.
Ayodhya Ram Temple Threat : अयोध्यातील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
संपूर्ण भारतातील ५४० हून अधिक अधिकृत बँक शाखांमध्ये वेबसाइट किंवा ऑफलाइन नावनोंदणी सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेसाठी १३ ते ७० वयोगटातील भाविक नोंदणी करू शकतात. यामध्ये ६ आठवडे किंवा त्याहून अधिक गर्भवती महिला, आजारी वयोवृद्ध भाविकांना यात्रेसाठी प्रवास करण्याची परवानगी नाही. यात्रेकरूंचा उत्साह आणि सरकारची तयारी पाहता, यावेळी अमरनाथ यात्रा आणखी भव्य आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.
🔷️ Registrations for 52-day long upcoming annual #AmarnathYatra-2025 begins; Pilgrims can register online via @ShriSasb website or offline at over 540 authorized bank branches across #India; Annual Yatra to commence on July 3.
@diprjk @OfficeOfLGJandK pic.twitter.com/qTz7F5OhBK
— DD NEWS JAMMU | डीडी न्यूज़ जम्मू (@ddnews_jammu) April 15, 2025
‘या’ भाविकांना यात्रेसाठी परवानगी नाही
यंदा ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी १३ ते ७० वयोगटातील भाविक नोंदणी करू शकतात. ६ आठवडे किंवा त्याहून अधिक गर्भवती महिला, आजारी वयोवृद्ध भाविकांना यात्रेसाठी प्रवास करण्याची परवानगी नाही. यात्रेकरूंचा उत्साह आणि सरकारची तयारी पाहता, यावेळी अमरनाथ यात्रा आणखी भव्य आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.