Sunday, October 26, 2025
Happy Diwali

४३ वर्षे, २८१ दिवस...एम एस धोनीने रचला इतिहास

४३ वर्षे, २८१ दिवस...एम एस धोनीने रचला इतिहास

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने ११ बॉलमध्ये २६ धावांची नाबाद खेळी करत संघाला ३ चेंडू राखत ५ विकेटनी विजय मिळवून दिला. चेन्नईचा हा हंगामातील दुसरा विजय आहे. हा सामना लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. येथे लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईसमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. धोनीला प्लेयर ऑफ दी मॅच निवडण्यात आले. त्याला ६ वर्षांनी हा पुरस्कार मिळाला आहे. मात्र यानंतर त्याने इतिहास रचला आहे.

एमएस धोनी आयपीएल इतिहासात प्लेयर ऑफ दी मॅच हा पुरस्कार जिंकणारा सर्वात वयस्कर क्रिकेटर ठरला आहे. त्याने प्रवीण तांबे यांचा रेकॉर्ड मोडला. त्यांना ४३ वर्षे ६० दिवस या वयात पुरस्कार जिंकला होता. एमएस धोनीने ४३ वर्षे २८१ दिवस इतक्या वयात प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार जिंकला आहे.

एमएस धोनीचा हा आयपीएलमध्ये १८वा प्लेयर ऑफ दी मॅच पुरस्कार आहे. २००८मध्ये जेव्हा त्याने पहिल्यांदा हा पुरस्कार जिंकला होता तेव्हा त्याचे वय २५ वर्षे होते. त्यानंतर याआधी शेवटच्या वेळेस त्याला हा पुरस्कार देण्यात आला तेव्हा त्याचे वय ३७ वर्षे होते.

Comments
Add Comment