Wednesday, April 16, 2025
Homeब्रेकिंग न्यूजBMC : टँकर मालकांचा संप मागे, विहिरी आणि कुपनलिका आता महापालिका घेणार...

BMC : टँकर मालकांचा संप मागे, विहिरी आणि कुपनलिका आता महापालिका घेणार नाही ताब्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील टँकरचालकांचा संप पाहता, व्यापक जनहित लक्षात घेता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू करुन मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला. याअनुषंगाने, आपली बाजू मांडण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची १४ एप्रिल २०२५ भेट घेतली. या बैठकीत दोन्ही बाजुंनी सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर काही वेळाने टँकरचालकांनी संप मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर केले. त्यामुळे मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच पाणीपुरवठा करणारे खासगी टँकर्स अधिग्रहित करण्याची महानगरपालिका प्रशासनाला आवश्यकता भासणार नाही.

Mumbai Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७.८५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त

या बैठकीला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्यासह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ तर मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने सचिव राजेश ठाकूर, उपाध्यक्ष हरबंस सिंग, जीतू शाह, खजिनदार अमोल मांढरे यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य हजर होते. टँकर चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली. संघटनेच्या मागण्या केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्यात याव्यात. केंद्रीय भूजल प्राधिकरण यांचेकडे वेळोवेळी बाजू मांडण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सहाय्य मिळावे, अशी संघटनेने विनंती केली. तसेच मागण्यांचे सविस्तर निवेदन महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सादर केले.

Salman Khan : कार बॉम्बने उडवून देऊ, सलमान खानला आली नवी धमकी; पोलीस तपास सुरू

टँकर चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले की, केंद्रीय भू-जल प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने बजावलेल्या नोटिसांना १५ जून २०२५ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. तसेच, नियम न पाळल्यास विहीर व कूपनलिका धारकांची मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा परत घेण्याचे ठरले. मात्र ज्या धारकांनी मान्यताच घेतलेली नाही त्याना मान्यता घ्यावी लागेल हे स्पष्ट करण्यात आले. तसेच केंद्र शासनाशी निगडित मागण्या व बाबी संबंधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी देखील महानगरपालिकेच्या वतीने संघटनेला प्रशासकीय सहाय्य पुरवले जाईल. मात्र तांत्रिक बाबी या शासनाच्या स्तरावरील असून त्यामध्ये महानगरपालिका प्रशासन हस्तक्षेप करू शकत नाही. मुख्यमंत्री यांनी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री महोदय यांनी दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे टँकर चालक संघटनेने देखील सारासार विचार करून आपली भूमिका ठरवावी, असे गगराणी यांनी बैठकीत स्पष्ट केले.

या सविस्तर व सकारात्मक चर्चेनंतर, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काही तासांचा अवधी मागून घेतला आणि संघटनेची बैठक घेवून त्याआधारे भूमिका जाहीर करण्यात येईल, ही भूमिका सकारात्मक असेल, असे सांगितले होते. त्यानंतर, असोसिएशनने संप मागे घेत असल्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -