Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीRussia Attack Ukraine : युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर रशियाचा मुद्दामून ड्रोन हल्ला,...

Russia Attack Ukraine : युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर रशियाचा मुद्दामून ड्रोन हल्ला, ३२ ठार

किव्ह : युक्रेनची राजधानी किव्हमधील भारतातील प्रसिद्ध औषध कंपनी ‘कुसूम’च्या गोदामावर रशियाने ड्रोन हल्ला केला आहे. भारताशी मैत्रीचा दावा करणाऱ्या रशियाने मुद्दाम या उद्योगावर हल्ला केल्याचा आरोप युक्रेनने केला. दरम्यान, रशियाने केलेल्या या हल्ल्याबाबत भारत किंवा रशिया या दोन्हीपैकी एकाही देशाने अद्याप भाष्य केलेले नाही.या हल्ल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

राजीव गुप्ता यांची मालकी असलेली कुसूम फार्मा ही युक्रेनला औषधांचा पुरवठा करणारी सर्वांत मोठी कंपनी आहे. युक्रेनला नित्य गरजेच्या औषधांचा पुरवठा करणारी ही कंपनी प्रमुख स्रोत आहे. या गोदामावरच ड्रोनने हल्ला करून रशियाने हे मोठे गोदाम नष्ट केले आहे.

Mumbai Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७.८५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त

रशियाने केलेल्या या हल्ल्यात भारतीय कंपनीच्या गोदामात असलेली अत्यंत महत्त्वाची औषधे नष्ट झाल्याचे युक्रेनच्या वकिलातीने म्हटले आहे. या औषधांचा वापर प्रामुख्याने वृद्ध नागरिक आणि लहान मुलांच्या आजारांवर उपचारांसाठी केला जात होता. युक्रेनमधील ओषधाच्या गोदामावर रशियाने केलेल्या हल्ल्याचा ब्रिटनने तीव्र निषेध करून या हल्ल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

युक्रेनच्या सुमी शहरावर रविवारी (दि.१३) रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान ३२ नागरिक ठार, तर ९९ लोक जखमी झाले.त्यात ११ मुलांचा समावेश आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सकाळी स्थानिक प्रमाणवेळेनुसार सव्वादहाच्या सुमारास दोन क्षेपणास्त्रे धडकली.या हल्ल्यात इमारतींच्या ढिगाऱ्यात जळालेल्या कारही दिसत होत्या. या हल्ल्यात जास्तीत जास्त जीवितहानी व्हावी म्हणून रशियाने क्लस्टर युद्धसामग्रीचा वापर केला असल्याची माहिती आहे. युक्रेनमधील शहरांवर नागरी वस्त्यांत रशियाने केलेला हा दुसरा मोठा हल्ला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -