Wednesday, April 16, 2025
Homeताज्या घडामोडीPM Modi : कोण आहेत रामपाल कश्यप ज्यांच्या पायात मोदींनी घातले बूट...

PM Modi : कोण आहेत रामपाल कश्यप ज्यांच्या पायात मोदींनी घातले बूट ?

चंदिगड : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जगभर कोट्यवधी चाहते आहेत. पण हरियाणातील कैथल येथे राहणाऱ्या रामपाल कश्यप यांची गोष्टच निराळी आहे.

रामलाल कश्यप यांनी १४ वर्षांपूर्वी शपथ घेतली की, जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाहीत आणि मी त्यांना भेटत नाही तोपर्यंत पायात चप्पल किंवा बूट घालणार नाही. अनवाणी राहणार. या शपथेचे रामलाल कश्यप प्रामाणिकपणे पालन करत होते. नरेंद्र मोदी मे २०१४ मध्ये पंतप्रधान झाले. पण मोदींची आणि रामलाल कश्यप यांची त्यावेळी भेट झाली नव्हती. रामलाल कश्यप हे त्यांच्या शपथेवर ठाम राहिले. त्यांनी मोदींना भेटेपर्यंत अनवाणी राहण्याचा चालायचे असे स्वतःच ठरवले आणि त्या निर्णयाचे पालन सुरू केले.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल, मुस्लिमांची सहानुभूती असेल तर काँग्रेस मुस्लिमाला पक्षाचा अध्यक्ष का करत नाही?

अखेर सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नियोजीत हरियाणा दौऱ्याच्या निमित्ताने यमुनानगर येथे पोहोचला. हा मोदींच्या सोमवारच्या हरियाणा दौऱ्यातला दुसरा टप्पा होता. यमुनानगर येथे पंतप्रधान मोदी यांना रामलाल कश्यप भेटले. या भेटीत पंतप्रधान मोदींनी रामलाल कश्यप यांची विचारपूस केली. भविष्यात पुन्हा अनवाणी चालण्याची शपथ घेऊ नका. जर शपथ घ्यायचीच असेल तर सामाजिक कार्यासाठी, देशहितासाठी घ्या; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यानंतर पंतप्रधान मोदींनी यांनी रामलाल कश्यप यांच्या पायात बूट घातले.

उद्धव गटात खैरे-दानवे वादामुळे दुफळी; दानवेंमुळे सगळे पक्ष सोडत असल्याचा खैरेंचा आरोप

पंतप्रधान मोदी हे हरियाणा भाजपाचे प्रभारी होते त्या काळात अनेकदा हरियाणातील यमुनानगर येथे येत – जात होते. आता यमुनानगर प्लायवूड, पितळ, स्टील अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे योगदान देऊन देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावत आहे. हे सर्व समजल्यामुळे आनंद झाल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

Robert Vadra : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा पाठोपाठ रॉबर्ट वाड्रालाही व्हायचंय खासदार

 

View this post on Instagram

 

A post shared by Narendra Modi (@narendramodi)

कोण आहेत रामलाल कश्यप ?

रामलाल कश्यप हे हरियाातील कैथल जिल्ह्यातील खेडी गुलाम अली या गावातले रहिवासी आहेत. ते भाजपाचे शक्ती केंद्र प्रमुख आहेत. याआधी ते काही काळ भाजपाचे मंडळ अध्यक्ष पण होते. मजूर असलेले असलेल्या रामलाल कश्यप यांच्या कुटुंबात पत्नी तसेच दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. रामलाल कश्यप ५५ वर्षांचे आहेत. त्यांनी सांगितले की १८ व्या वर्षी मतदार झाल्यापासून अनेकदा मतदान केले. कायम देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या पक्षालाच मतदान केल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान मोदींशी झालेली भेट आयुष्यभर आठवणीत राहील, असे रामलाल कश्यप म्हणाले. मोदींना भेटण्यासाठी रामलाल कश्यप यांनी भाजपाचे माजी आमदार कुलवंत राम बाजीगर यांना पत्र लिहिले होते आणि घेतलेल्या शपथेच तसेच करत असलेल्या कृतीची माहिती दिली होती. यानंतर भाजपाच्या नेत्यांनी हरियाणा दौऱ्याच्या निमित्ताने मोदी आणि रामलाल कश्यप यांची भेट व्हावी यासाठीचे नियोजन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -