मुंबई: प्रत्येक घरात वास्तुशास्त्राचे महत्त्व असते. सोबतच वास्तुशास्त्राचा आपल्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत असतो. घर नेहमीच वास्तुशास्त्रानुसार दिशेच्या हिशेबाने बांधले जाते. तसेच घर बांधताना काही नियमांचे पालन करणे गरजेचे असते.
वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या किचनमध्ये वारंवार या गोष्टी सांडत असतील आणि तीच चूक तुम्ही पुन्हा पुन्हा करत असाल तर ते तुम्हाला भारी पडू शकते.
जर किचनमध्ये मीठ सतत सांडत असेल तर शनीदेव तुमच्यावर नाराज आहे. मीठ हे चंद्र आणि शुक्रचे प्रतिनिधित्व करते आणि यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.
याशिवाय, मोहरीचे तेल पडणेही अशुभ मानले जाते. याचाच अर्थ खराब दिवसांची सुरूवात असल्याचे संकेत आहेत. सोबतच याचा राहू केतुशी संबंध असतो. यामुळे समजते की शनीदेव तुमच्यावर नाराज आहेत.
जर अशा गोष्टी वारंवार सांडत असतील तर काही गोष्टींचे दान करणे सुरू करा. यामुळे त्यापासून होणाऱ्या समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते.