Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

एसटी बसेसमध्ये लागणार जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटन

एसटी बसेसमध्ये लागणार जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटन

मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात परिवहन मंडळाने महत्तवाचा निर्णय घेतला आहे.स्वारगेट घटनेनंतर एसटीकडून सध्याच्या १२ हजार बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जिपीएस बसवण्यात येणार आहे.याशिवाय एसटी महामंडळाने नव्या अडीच हजार गाड्यांमध्ये जीपीएस, पॅनिक बटण आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे


एसटी महामंडळाकडे सध्या उपलब्ध असलेल्या १५ हजार बसेसपैकी ३००० बस पुढील वर्षभरात स्क्रॅपमध्ये जाणार आहेत. सुस्थितीतील असलेल्या १२ हजार बस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार आहे आहेत. या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या बसेसमध्ये दोन महिन्यांत प्रत्येकी ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे. तसेच त्याचे मॉनिटरिंग गाडीतच असणार आहे. महामंडळाच्या सर्व बसेसना जीपीएस प्रणाली देखील बसवली जाणार आहे. त्यामुळे बसेसचे नेमके लोकेशन समजायला मदत होणार आहे.


यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून देखील निधी मागण्यात आला असून मे महिन्यात निविदा प्रक्रिया राबवण्याचे नियोजन केले जात आहे. एसटी महामंडळाने याआधी कोट्यवधी रुपये खर्च करून १४ हजार बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवली होती.मात्र त्यातील ६००० गाड्यांमधील यंत्रणा निकामी झाली आहे. पडताळणी केल्यानंतर फक्त ८००० बसेसमधील जीपीएस यंत्रणा सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता ६००० बसगाड्यांमध्ये पुन्हा नव्याने जीपीएस मशिन बसवावे लागणार आहेत

Comments
Add Comment